बातम्या
किरण लोहारांकडे सापडले सहा कोटीचे घबाड !
By nisha patil - 6/12/2023 7:36:39 PM
Share This News:
किरण लोहारांकडे सापडले सहा कोटीचे घबाड !
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी म्ह्णून काम करताना २५ हजार रुपयांची लाच घेताना कारवाई झालेल्या तत्कालिन शिक्षणाधिकारी किरण आनंदा लोहार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर पाच कोटी ८५ लाख ८५ हजार ६२३ रुपयेच्या किंमतीची भ्रष्ट मार्गाने जमविलेली मालमत्ता आढळूनआली आहे.सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागााचे पोलिस निरीक्षक लुमाकांत महाडिक यांनी, सोलापूर सदर बझार पोलिस ठाण्यात किरण लोहार (वय ५० वर्षे), त्यांच्या पत्नी पत्नी सुजाता किरण लोहार (वय ४४ वर्षे), मुलगा निखिल किरण लोहार (वय २५ वर्षे) (शिक्षक कॉलनी पाचगाव, कोल्हापूर) यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान सोलापूर येथील पोलिसांचे एक पथक कोल्हापुरातील पाचगाव येथील शिक्षक कॉलनी येथील लोहार यांच्या निवासस्थानी तपासणी करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.लोहार यांनी १५ नोव्हेंबर १९९३ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत ठिकठिकाणी काम करताना वैध उत्पनापेक्षा १११.९३ टक्के जादा रक्कम अवैधरित्या जमविली आहे. लोकसेवक या नात्याने कर्तव्य करत असताना परिक्षण कालावधीमध्ये कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा भ्रष्ट व गैरमार्गाने मालमत्ता जादा मालमत्ता जमविली आहे. त्यांच्या कुटुबीयांतील सदस्यांच्या नावावरही ही मालमत्ता आढळते. या कारणास्तव लोहार, त्यांच्या पत्नी, व मुलगा यांच्या विरोधात गुन्हा नोंद केल्याचे पोलिस निरीक्षक लुमाकांत महाडिक यांनी सांगितले.
लोहार यांनी रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर अशा विविध ठिकाणी नोकरी केली आहे. त्यांनी भ्रष्ट मार्गाने ठिकठिकाणी मालमत्ता जमविल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यांची कोल्हापुरातील कारकिर्द वादग्रस्त ठरली होती. कोल्हापुरात माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून काम करताना त्यांच्या कामकाजाविषयी सर्वसाधारण सभेतही चर्चा झाली होती. सोलापुरात लाच घेताना सापडल्यानंतर लोहार यांना निलंबित करण्यात आले आहे.
किरण लोहारांकडे सापडले सहा कोटीचे घबाड !
|