बातम्या

बिग बी,च्या वाढदिवसानिमित्त किरण मानेची खास पोस्ट

Kiran Manes special post on the occasion of Big Bs birthday


By nisha patil - 11/10/2023 7:18:53 PM
Share This News:



 बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 81 वा वाढदिवस आहे.  अमिताभ बच्चन यांचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अभिनेते किरण माने  यांनी देखील सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करुन बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. 

किरण माने यांनी फेसबुकवर एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांच्या फोटोवर " नमस्कार मी मुंबईचा किरण माने" असं लिहिलेलं दिसत आहे. किरण माने यांनी हा फोटो फेसबुकवर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "या पोस्टबरोबर टाकलेलं हे मीम खरंतर बिगबॉसमध्ये 'सातारचा बच्चन' हा टॅग मिळाल्याची खिल्ली होती. विशेष म्हणजे
 

 शाळेत असल्यापासून या टोमन्याची सवय आहे मला."किरन्या माने स्वत:ला बच्चन समजतो." हे लहानपासूनच ऐकत आलोय. खरंतर म्हणणाऱ्यानं ते चिडून म्हणलेलं असायचं, पण मनातल्या मनात मी खुश व्हायचो ! ल्हानपनी 'बच्चन' हे माझं 'जग' होतं. मायनीच्या 'गरवारे टुरींग टॉकीज'च्या तंबूत बच्चनच्या पिच्चरचं रीळ आल्यापासून मी तिथं हजर असायचो. आलेली पोस्टर्स उलगडून पाहत रहानं हा आवडता छंद होता. रीळ चेक करताना टाकलेले फिल्मचे तुकडे मी घेऊन यायचो.मग ती फिल्म बल्बपुढं धरून एकेका फ्रेममधला बच्चन न्याहाळत बसायचा नाद होता. पिच्चर जाईपर्यन्त रोज बघायचो मी. पाठ व्हायचा पिच्चर. मग खंडोबाच्या माळावर दोस्त जमवून त्यांना बच्चनची ॲक्टिंग करून दाखवत अख्ख्या पिच्चरची स्टोरी सांगायची.बच्चनचं चालनं - बोलणं- बघणं - उभं रहाणं- बसणं - पळणं - फायटिंग करनं सगळं-सगळं माझ्यात भिनलं होतं लहानपणी."

पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "त्याचवेळी कधीतरी अन्यायाविरूद्ध लढणारा-जुल्मी व्यवस्थेविरूद्ध बंड पुकारनारा-गोरगरीबांसाठी पैशेवाल्यांशी पंगा घेणारा 'ॲंग्री यंग मॅन' मनामेंदूत,रक्तात भिनला! आता तरूनपणी मी काॅलेजमध्ये-हौशी नाट्यक्षेत्रात कुणावर अन्याय झाला की, पुढाकार घेऊन नाटकातल्या प्रस्थापितांशी पंगे घ्यायला सुरूवात केल्यावरही आजूबाजूचे म्हणाला लागले, "हा काय स्वत:ला बच्चन समजतो का काय?" ते ऐकूनबी मला खूप भारी वाटायचं !""पण खरे धक्के बसायला सुरूवात झाली ती अलीकडच्या दहाबारा वर्षांत ! तोच 'ॲंग्री यंग मॅन' वैयक्तिक आयुष्यात व्यवस्थेला शरण जाणारा, मान खाली घालून स्वाभिमान गुंडाळून ठेवणारा हा 'शहेनशाह' बघून वाईट वाटायला लागलं.  पुर्वी पेट्रोल 60 रूपये झाल्यानंतर सोशल मिडीयावरुन जहरी टीका करणारा बच्चन आज पेट्रोल गगनाला भिडूनबी 'चुप्पी साधलेला' बघून आश्चर्य वाटायला लागलं. कुणाच्यातरी आदेशावरनं आरेच्या वृक्षतोडीचं समर्थन करन्याची पोस्ट करणारा.  ज्या पंजाबनं त्याला मुलगा मानलं, त्या पंजाबी शेतकर्‍यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा मूग गिळून गप्प बसणारा. केविलवाना बच्चन बघून कीव यायला लागली.  पण लै इचार केल्यावर एक लक्षात आलं की, या मानसानं त्याच्या अभिनयाच्या ताकदीवर जो 'बच्चन' आपल्या मनामेंदूत-रक्तात धगधगता ठेवलाय तीच त्यानं आपल्याला दिलेली ताकद ! बच्चननं स्वत:मधला 'बच्चन'  हरवला पण आपल्यामध्ये तो आहेच की...जिवंत - रसरशीत - खणखणीत !! त्यानं त्याचं आयुष्य कसं जगायचं ते आपन नाय ठरवू शकत. आपल्याला जे हवंय ते त्यानं दिलंय, भरभरुन.. बस्स !!! सलाम महानायक, कडकडीत सलाम." असंही किरण माने यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.


बिग बी,च्या वाढदिवसानिमित्त किरण मानेची खास पोस्ट