बातम्या
चाकू हल्ला प्रकरण : चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
By nisha patil - 3/27/2025 4:44:43 PM
Share This News:
चाकू हल्ला प्रकरण : चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
शाहूवाडी तालुक्यातील सोंडोली गावात झालेल्या गंभीर हल्ला प्रकरणात चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलीय. या घटनेत संजय जाधव यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. दि. १९ ऑगस्ट २०१८ रोजी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास संजय जाधव आपल्या घरी टीव्ही पाहत असताना चार आरोपी त्यांच्या घरात घुसले. भरत पाटील याने चाकूने संजय जाधव यांच्या गळ्यावर, डोळ्याजवळ व चेहऱ्यावर वार केले.
त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांच्या बहिणीने आरडाओरड केल्यानंतर शेजारी मदतीला धावले, त्यामुळे आरोपींना पळ काढावा लागला. सरकारी वकील मंजुषा बी. पाटील यांनी १२ साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार लक्ष्मी जाधव, निवृत्ती सावंत, महेंद्र चोरगे व विवेक पाटील यांच्या जबानीच्या आधारे आणि वैद्यकीय तपासणी अहवालाच्या आधारे न्यायालयाने खालील शिक्षा ठोठावली. शाहूवाडी पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्री. एम.व्ही. जठार यांनी या प्रकरणाचा तपास केला. सरकारी वकीलांच्या प्रभावी युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपींना कठोर शिक्षा ठोठावली.
चाकू हल्ला प्रकरण : चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
|