सीपीआर रुग्णालयात सुरक्षा दलाच्या जवानावर चाकू हल्ला: लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

Knife attack on security force personnel at CPR hospital Crime registered in Laxmipuri police station


By nisha patil - 5/27/2023 4:54:37 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दुचाकी ला प्रवेश नाकारल्याच्या रागातून एका तरुणाने सुरक्षा दलाच्या जवानावर चाकू हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये संशयित तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित तरुण हा सीपीआर रुग्णालयात आपली दुचाकी घेऊन जात असताना, सुरक्षा दलाचे जवान पवन कदम यांनी या तरुणाला अडवलं. यावेळी तरुणांनी मी कोण आहे? माहिती नाही का? तुला दाखवतो अशी धमकी देऊन निघून गेला. थोड्याच वेळात तो संशयीताने चाकू घेऊन पवन कदम यांच्यावर अचानक हल्ला चढवला .या हल्ल्यात पवन कदम यांच्या कमरेला हाताला गंभीर इजा झाली आहे. नंतर संशयित तरुण घटनास्थळावरून पसार झाला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.


सीपीआर रुग्णालयात सुरक्षा दलाच्या जवानावर चाकू हल्ला: लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद speednewslive24#