उन्हाळ्यात गुलकंदाचे सेवन करा 5 फायदे जाणून घ्या

Know 5 Benefits of Consuming Gulkanda in Summer


By nisha patil - 1/6/2023 7:03:07 AM
Share This News:



उन्हाळाचा हंगाम सुरु झाला आहे. उन्हाळ्यात उष्णतेचा काही लोकांना त्रास होतो. उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने गुलकंदचे सेवन करणे उन्हाळ्यात फायदेशीर आहे. गुलकंदाच्या सेवनाचे 5 आरोग्यदायी फायदे जाणून घ्या.
ताज्या गुलाबाच्या पाकळ्या आणि खडीसाखरेने बनवलेले गुलकंद केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. हे फायदे जाणून घेतल्यानंतर आपण आजपासून गुलकंदचे सेवन करण्यास सुरवात कराल.

1 गुलकंद शरीरातील अवयवांना थंडावा प्रदान करते. जेव्हा शरीरात उष्णता वाढते आणि उष्णतेमुळे होणाऱ्या सर्व समस्यांपासून मुक्त होण्यासाठी गुलकंदचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

2 गुलकंदाचे नियमित सेवन करणे मेंदूसाठी देखील फायदेशीर आहे. सकाळी आणि संध्याकाळी फक्त 1 चमचे गुलकंद खाल्ल्याने मेंदूला ताजेपणा मिळतो. मेंदू शांत राहतो आणि राग येत नाही.

3 बद्धकोष्ठता किंवा अपचन झाल्यावर याचे सेवन करणे रामबाण उपाय आहे. दररोज गुलकंदाचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता दूर होते आणि भूक वाढण्यासह पाचक प्रणाली सुरळीत करण्यास मदत होते. गरोदरपणात हे विशेषतः फायदेशीर आणि सुरक्षित आहे.

4 डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी आणि थंडावा प्रदान करण्यासाठी गुलकंदचा वापर करणे एक चांगला उपाय आहे. डोळ्यांची जळजळ आणि कंजक्ट‍िवाइटिसचा त्रास होण्यापासून मुक्त करेल.

5 गुलकंदाचा वापर तोंडाचे छाले आणि त्वचेच्या समस्यांसाठी देखील खूप फायदेशीर आहे, या मुळे थकवा व उर्जा कमी होण्यासाठी देखील गुलकंद फायदेशीर आहे.


उन्हाळ्यात गुलकंदाचे सेवन करा 5 फायदे जाणून घ्या