बातम्या
योगाभ्यास सुरू करण्यापूर्वी जाणून घ्या काही सूचना
By nisha patil - 4/11/2023 7:07:24 AM
Share This News:
पहाटेची वेळ योगाभ्यासासाठी सर्वात उत्तम. कारण त्या वेळी पोट रिकामे व हलके असते. ही वेळ ज्यांना सोयीस्कर नसेल त्यांनी दिवसभरात कुठल्याही वेळी रिकाम्या पोटी योगाभ्यास करावा. योगाभ्यास पूर्ण झाल्यावर अर्ध्या तासानंतर थोडे पेय किंवा फराळ घ्यावा, एक तासानंतर जेवण्यास हरकत नाही.
एखाद्या निवांत, हवेशीर, कीटकविरहित व स्वच्छ जागी योगाभ्यास करावा. घरामधील एक छोटा कोपरा असला तरीही चालेल; पण तो हवेशीर व स्वच्छच हवा. कमीत कमी, हलके, स्वच्छ व सैलसर कपडे घालावेत. योगाभ्यास साध्या, स्वच्छ बैठकीवर करावा. ही बैठक फार मऊ किंवा टणक नसावी. जे योगप्रकार तुमच्याकरिता निवडलेले आहेत त्यांचाच अभ्यास यशाशक्ती करावा. दुसºया कोणाहीबरोबर स्पर्धा करू नये.
उत्तम आरोग्यासाठी योगाभ्यासाबरोबर युक्त व संतुलित आहार व आवश्यक विश्रांती घेणे अत्यावश्यक आहे. स्त्रियांनी मासिक पाळीच्या वेळी तसेच प्रसूतिपूर्व व प्रसूतिपश्चात निवडक योगिक प्रकार अभ्यासावेत. या काळामध्ये चित्त शांत ठेवणारे, श्रमहारक, आराम देणारे आणि मन:शांतिवर्धक असे प्रकार आवर्जून करावेत.
योगाभ्यास सुरू करण्यापूर्वी जाणून घ्या काही सूचना
|