विशेष बातम्या

उन्हाळ्यात कवठ खाण्याचे फायदे जाणून घ्या

Know the benefits of eating kavatt in summer


By nisha patil - 6/14/2023 7:11:52 AM
Share This News:




मसालेदार चटणी अधिक उत्कृष्ट बनवणारे हे आंबट फळ आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
चला कवठाच्या काही फायद्यांविषयी जाणून घ्या
कवीठ फळात कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन नावाचे भरपूर पोषक असतात . हे बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, थायमिन आणि राइबोफ्लेविन देखील समृद्ध आहे. विविध पौष्टिक पदार्थांनी समृद्ध झाल्यामुळे पोटात कवीठ खूप फायदेशीर आहे.हे व्हिटॅमिन सी चे समृद्ध स्रोत आहे आणि व्हिटॅमिन सी ची कमतरता दूर करते.

* पचन चांगले राहते-चांगली पचनक्षमता ठेवतो , शरीराचे तापमान तसेच कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतो .शरीराला थंडावा देतो. तहान शमवून रक्तविकारापासून मुक्त करतो,बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा करतो. पोटाचे जंत नाहीसे करतो.

* रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करत -झाडाच्या खोड व फांद्यांमध्ये फेरोनि नावाचा डिंक असतो. रक्तातील साखरेचा प्रवाह, स्राव आणि संतुलन व्यवस्थापित करण्यास मदत करतो.हे डिंक इन्सुलिन आणि रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास रोखतो.

* डोकं दुखी कमी करतो- हृदय रोग आणि डोकेदुखीसाठी कवीठचे फळ फायदेशीर आहे. याचा सेवन केल्याने डोकेदुखीच्या समस्येपासून मुक्त होतो आणि यामुळे हृदयाचे आरोग्यही राखण्यास मदत करतो. .

* ऊर्जेची पातळी वाढवतो- या मध्ये जास्त प्रमाणात प्रथिने आढळतात ज्यामुळे ते शरीरास ऊर्जा प्रदान करण्यात मदत करते. याचा उपयोग शरीरात उर्जा टिकवून ठेवण्यासाठी केला जातो. कोणत्याही स्वरूपात याचे सेवन करणे फायदेशीर आहे.


उन्हाळ्यात कवठ खाण्याचे फायदे जाणून घ्या