बातम्या

वापरण्यापूर्वी जाणून घ्या ‘डे’ आणि ‘नाइट क्रीम’मधील फरक

Know the difference between ay and night cream before use


By nisha patil - 1/4/2024 7:19:53 AM
Share This News:



डे आणि नाईट क्रिममध्ये कोणता फरक असतो, हे अनेकांना माहित नसतो. मुळात या दोन्ही क्रीममध्ये खूप मोठा फरक आहे. त्वचेला क्रीम्सची गरज असते, पण कोणती क्रिम लावावी हे देखील तेवढेच महत्वाचे आहे. रात्री झोपताना अनेजण क्रिम लावतात. तर काहीजण घरातून बाहेर पडताना क्रीम लावतात. या दोन्ही क्रिम्सविषयी माहिती असणे आवश्यक असून ती माहिती आपण जाणून घेऊयात.

मेकअप, प्रदूषण, तणाव आणि यूव्ही किरणांमुळे त्वचेचे नुकसान होते. याकरीता त्वचेच्या सुरक्षेसाठी डे क्रीम वापरण्यात येते. यामध्ये एसपीएफ असते. हे बर्निंग आणि फोटोएजिंगपासून त्वचेचे रक्षण करते. कॅफीनसारख्या घटकांमुळे त्वचा अधिक तजेल आणि चांगली दिसते. डे क्रीम शक्यतो मेकअपच्या अगोदर लावण्यात येते. यामुळे याचा फॉम्र्युला लाइट आमि नॉनग्रीसी असतो. डे क्रीम फाउंडेशनसाठी एक मऊ आधार असते. अनेक डे क्रीम्समध्ये अँटी-एजिंग गुणदेखील असतात.

त्वचा रात्रीच्यावेळी जास्त काम करते. इतर अवयवांप्रमाणेच त्वचा सुद्धा रात्रीच्या वेळी आपली दुरुस्ती, पुनर्संचयिकरण आणि रीजनरेटिंग ही कामे करत असते. नाईट क्रीममध्ये मॉइस्चरायझर्स असतात. ते शक्तिशाली असून अत्यंत हळू गतीने त्वचा त्यांना शोषून घेते. रात्रीच्या वेळी सूर्याच्या किरणांची चिंता नसल्याने नाइट क्रीममध्ये एसपीएफ नसते. परंतु, नाईट क्रिममध्ये अँटी-एजिंग घटकांचे प्रमाण थोडे जास्त असते. यामुळे त्वचा आपले काम कोणत्याही अडथळ्याशिवाय करू शकते. या सर्व कारणांमुळे नाइट क्रीम, डे क्रीमपेक्षा थोडी जड असते. नाइट आणि डे क्रीममध्ये मोठा फरक असतो. दोन्हीचे उद्देश आणि पोत एकमेकांपेक्षा वेगळा आहे. नाइट क्रीम दिवसा लावली तर त्वचा अधिक तेलकट होते. ती सनस्क्रीनचे काम करणार नाही. तर रात्री डे क्रीमचा वापर केल्यास त्वचेला मॉइश्चर मिळेल पण अँटी-एजिंग आणि मॉस्चराइजिंग एजेंट्स परिणामकार ठरणार नाहीत.


वापरण्यापूर्वी जाणून घ्या ‘डे’ आणि ‘नाइट क्रीम’मधील फरक