बातम्या

शिळी चपाती खाल्ल्यामुळे आरोग्यावर काय परिणाम होता जाणून घ्या

Know the health effects of eating stale chapatis


By nisha patil - 6/28/2023 8:13:51 AM
Share This News:



भारतीय जेवण  पद्धतीत पोळी  म्हणजेच चपाती हे अविभाज्य घटक आहे. दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचं भारतीयांना ताटात भाजी पोळी लागते.

गरम गरम साखर पोळी खायला अनेकांना आवडतं. भारतात अनेक घरांमध्ये सकाळच्या नाश्ता चहा चपाती  खाण्याची पद्धत आहे. अनेक वेळा घरामध्ये पोळी किंवा चपाती उरते मग दुसऱ्या दिवशी त्याचं काय करायचं असा प्रश्न पडतो. अनेक आरोग्य तज्ज्ञ (Health expert) ताजं अन्न खाण्यावर भर देतात. मग शिळी पोळी खाल्ल्यामुळे आरोग्यावर परिणाम तर नाही होणार असा अनेकांना प्रश्न असतो. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण शिळी पोळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. 

शिळ्या चपात्या खाण्याचे फायदे 


पोटाचे दुखणे दूर होते 

शिळी चपातीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पोटाचे आजार दूर होतात. तसंच शिळी चपाती खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते. त्यामुळे बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीचा त्रास होत नाही.

साखर राहते नियंत्रणात 

दररोज दुधात मिसळून शिळी चपाती खाल्ल्यास तुमचा रक्तदाब आणिन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. शिळ्या चपात्यांमध्ये काही बॅक्टेरिया असतात ज्यामुळे ग्लुकोजची पातळी कमी राहण्यास मदत होते.

शरीराची ताकद वाढते 

दुधात मिसळून शिळी चपाती  खाल्ल्याने शरीराची ताकद वाढते आणि स्नायू मजबूत होतात.


शरीराचे तापमान नियंत्रणात राहते 

उन्हाळ्यात शिळ्या चपात्या खूप फायदेशीर ठरतात. शिळ्या चपात्यांमध्ये शरीराचे तापमान टिकवून ठेवण्याची गुणवत्ता असते.

उष्माघात धोका कमी

उन्हाळ्याच्या दिवसात शिळ्या चपात्या खाल्ल्यामुळे उष्माघाताचा धोका कमी होतो.

बीपी नियंत्रणात राहते 

रक्तदाबाच्या रुग्णांसाठीही शिळी चपाती फायदेशीर आहे. शिळ्या रोट्यामध्ये काही चांगले बॅक्टेरिया येतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

वजन वाढण्यास मदत 

दुधासोबत शिळ्या चपात्या खाल्ल्यास दुबळेपणा दूर होतो आणि वजन वाढण्यास मदत होते.

शिळी भाकरी उर्जेने भरेल

शिळ्या चपात्या सेवन केल्याने भरपूर ऊर्जा मिळते. आळशी व्यक्तीने शिळी चपाती खाल्ल्यास फायदा होतो.


जीम  जाणाऱ्यांसाठी फायद्याची

तुम्ही जीमला जात असाल तर शिळ्या चपात्या नक्कीच खाव्यात. जीममध्ये स्नायू वाढवणाऱ्यांसाठी शिळ्या चपात्या खूप फायदेशीर आहे.


शिळी चपाती खाल्ल्यामुळे आरोग्यावर काय परिणाम होता जाणून घ्या