बातम्या

जाणून घ्या, हाडजोड वनपस्तीचे बहुगुणी फायदे.

Know the multifold benefits of Hadjod Vanpasti


By nisha patil - 6/19/2023 9:00:22 AM
Share This News:



हाडजोड ही मांसल खोड व पाने असलेली वेल समान झुडूप वर्गीय वनस्पती असून यांच्या खोडाचा व पानांचा उपयोग होतो. हाडजोड मॅग्नेशियम, कॅलसियम, क जीवनसत्त्वे, फ्लावोनाईड्स यांचे विपुल भांडार आहे.

या वनस्पतीला कांडवेल, हाडजोडी, अस्थिसंधान, त्रिधारी, चौधरी असे देखील म्हणतात.नुसते हाड जोडनेच नव्हे तर खूप औषधी उपयोग असलेली ही हाडजोडी वनस्पती आहे. हाडजोड वनस्पती हडातील खनिज निर्मिती वाढवून हाडांची घनता योग्य ठेवण्यास व हाडे मजबूत करण्यात मदत करते. मोडलेल्या हाडांची जोडणी, हाडातील व संध्यातील वेदना यावर हाडजोड वनस्पती अतिशय उपयोगी आहे.हाडजोड मूत्र मार्गातील प्रवाह वाढवून शरीरातील अशुद्धी बाहेर टाकण्यास मदत करते. तसेच हाडजोड वनपस्ती पचना साठी ही उपयोगी आहे. भारताच्या बरीच भागात याची भाजी रोजच्या जेवणात समाविष्ट केली जाते.

दाक्षिणात्य राज्यांमध्ये तसेच विदर्भातील काही भागात रस्त्याच्या बाजूला, बांधावर, माळरानावर हाडजोड वनस्पती विपुल आढळते. तुम्ही कुंडीत किंवा बागेत हाडजोड वनस्पतीची लागवड करू शकतात. पडीक जमिनीवरील फळबाग, वनशेती इत्यादी अंतर पीक म्हणून ही वनस्पती घेता येणे शक्य आहे. जर आपल्या घरात उपद्व्यापी व्यक्ती असेल तर हाडजोड सारखी गुणकारी आणि औषधी वनस्पती घराच्या बागेत हमखास हवी.


जाणून घ्या, हाडजोड वनपस्तीचे बहुगुणी फायदे.