बातम्या

स्वतःमधील बलस्थान ओळखून वाटचाल करा : अनया जमदग्नी

Know your strengths and move forward  Anaya Jamadagni


By nisha patil - 7/3/2024 10:30:11 PM
Share This News:



स्वतःमधील बलस्थान ओळखून वाटचाल करा : अनया जमदग्नी

डॉ डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये विविध  स्पर्धांचा बक्षीस वितरण

 स्त्री ही त्याग,प्रेम आणि संयमाचे प्रतीक आहे. त्यांच्यामध्ये अंगभूत कौशल्ये असतात. स्पर्धेच्या युगात स्वतःमधील बलस्थान ओळखून वाटचाल करा असे प्रतिपादन रेडिओ मिरचीच्या प्रोग्राम हेड अनया जमदग्नी यांनी केले. कसबा बावडा येथील डॉ डी वाय पाटील पॉलिटेक्निक मध्ये महिला दिनानिमित्त आयोजित विविध  स्पर्धांच्या बक्षीस वितरण प्रसंगी बोलत होत्या.यावेळी प्राचार्य डॉ महादेव नरके यांची  उपस्थित होते.

जमदग्नी पुढे म्हणाल्या, कोणत्याही क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली आवड देखील जोपासावी. प्रत्येकाकडे वेगळे कौशल्य असते.हे कौशल्य विकसित करण्यासाठी त्याकडे अधिक लक्ष दिले तर यश निश्चित आहे.

प्राचार्य डॉ.महादेव नरके यांनी मुलींच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढीसाठी हिरकणी मंचची स्थापना केल्याचे सांगितले

पाककला स्पर्धेतील विजेत्या तनिष्का पाटील,सृष्टी भोसले,धनश्री पाटील,मेहंदी स्पर्धेतील विजेत्या समृध्दी घोडके,वैष्णवी देसाई तर रांगोळी स्पर्धेतील विजेत्या अर्पिता जाधव आणि राही पाटील यांना सन्मानित करण्यात आले. तर संस्कृती सांगावकर हिला बेस्ट हिरकणी म्हणून गौरविण्यात आले. 
 प्रा.शितल साळोखे, प्रा नीलम रणदिवे, प्रा ऐश्वर्या पाटील, प्रा स्वाती पाटील, प्रा पूजा मोरे यांच्यासह हिरकणी मंचच्या सदस्यानी संयोजन केले.

 


स्वतःमधील बलस्थान ओळखून वाटचाल करा : अनया जमदग्नी