बातम्या

कोडोली ---ग्राहकाच्या नावावर उचलले कर्ज एकाला अटक

KodoliOne arrested for taking a loan in the name of a customer


By nisha patil - 12/24/2023 11:05:05 PM
Share This News:



कोडोली ---ग्राहकाच्या नावावर उचलले कर्ज एकाला अटक 

होम अॅप्लाईन्सच्या खरेदीसाठी ग्राहकांनी दिलेल्या अमोल काईगडे कागदपत्रांवर फायनान्स कंपनीकडून त्यांच्या नावावर खोटी कर्जे उचलून फायनान्स कंपनीची पावणेसहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पन्हाळा तालुक्यातील कोडोली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कोडोलीतील अमोल संजय काईंगडे याला अटक करण्यात आली आहे. या बाबतची फिर्याद फायनान्स कंपनीच्या वतीने सातारा जिल्ह्यातील सैदापूर येथील दिनेश विलास आगलावे यांनी कोडोली पोलिसांत दिली आहे.अमोल काईंगडे यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

 अमोल काईंगडे याचे कोडोली -वारणा रोडवर स्वरा इलेट्रॉनिक्स नावाचे शोरूम आहे. या दुकानातून होम अॅप्लाईन्सच्या वस्तू फायनान्स कंपन्या सुलभ हप्त्यावर देत असल्याने येथे ग्राहक वस्तू घेणेसाठी येत होते. त्या वस्तू फायनान्सवर घेताना फायनान्स कंपनीला आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक यासारख्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत द्यावी लागते. ग्राहक ही सर्व कागदपत्रे देऊन फायनान्सवर वस्तू घेऊन जातात. याचा फायदा घेत काईंगडे याने त्या कागदपत्राच्या दुसऱ्या प्रती काढून ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या काळात ग्राहकांच्या संमतीशिवाय नावावर कर्ज काढले. या कर्जाचा हप्ता थकीत गेल्यावर फायनान्स कंपनीने ग्राहकांच्या मागे वसुलीचा तगादा लावल्यावर ही बाब फायनान्स कंपनीच्या लक्षात आली. त्यांनी सखोल चौकशी केली असता त्यांची ५ लाख ७२ हजार ५६५ रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी कोडोली पोलिसांत काईंगडे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.कोडोली पोलिसांनी त्याला अटक करून पन्हाळा न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.


कोडोली ---ग्राहकाच्या नावावर उचलले कर्ज एकाला अटक