बातम्या
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन करण्याच्या उद्दिष्टात कोल्हापूरचा सहभाग - पालकमंत्री हसन मुश्रीफ
By neeta - 8/1/2024 6:01:09 PM
Share This News:
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या संपूर्ण आढावा घेण्यासाठी आज नियोजन समितीचा आढावा बैठक घेण्यात आली. यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी 2023 - 2024 मध्ये 480 कोटी रुपये अनुसूचित जाती, उपयोजना विशेष घटक यासाठी 117 कोटी, आदिवासी उपाय योजना बाह्यशील 1.27 कोटी रुपये असा 598.67 कोटींचा आराखडा होता. त्यापैकी जवळजवळ 70 टक्के म्हणजे 395.14 कोटी रुपये इतका निधी प्राप्त झाला आहे. या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जवळजवळ 50 टक्के तो खर्च करण्यात आला आहे. सटके पैसे आता प्राप्त झाले आहेत. या मार्च पर्यंत शंभर टक्के खर्च करण्याची सर्व विभागाने खात्री दिली आहे. जे विभाग खर्च करणार नाही त्यांचे पुनर नियोजन करणार आहोत. ज्या विभागाला विशेषतः एम एस ई बी ला, रस्त्याला जे पैसे कमी पडत आहे त्यांचे पुनर्जन नियोजन करणार आहोत अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली.
यामध्ये अनेक ठराव मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये पाडगाव धरणाचे पाणी देऊ नये, जिल्ह्यातील अंबाबाई विकास आराखडा व ज्योतिबा मंदिर विकास आराखड्याचा सादरीकरण या बैठकीत करण्यात आलं. यामध्ये महालक्ष्मी विकास आराखडा यासाठी जवळजवळ साक्षी कोटी रुपयांचा खर्च जागा ,भूसंपादन व विकासासाठी लागणार आहेत. आणि हे जर पूर्ण झाले तर कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकसित झाली तेथे दहा पटीने पर्यटन भाविक वाढले आहेत. एक कोटी पेक्षा जास्त भाविक अंबाबाई व जोतिबाला येतात, हे जर पूर्ण झाले तर जवळजवळ दहा कोटी पर्यटक दरवर्षी या दोन्ही क्षेत्राला येतील असा विश्वास हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र शासनाने व नियोजन मंडळांनी 2018 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन करावे असे उद्दिष्ट दिला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील संभाव्यवृद्धी लक्षात घेता, कोल्हापूर जिल्हा कडून महाराष्ट्र राज्यातील वित्त विभागाने 18.1 टक्के उद्दिष्ट दिले आहे. संपूर्ण राज्यामध्ये इतर जिल्ह्यांपेक्षा कोल्हापूर जिल्ह्याला जास्त दिले आहे. याचं कारण कोल्हापूर जिल्हाचा जीडीपी आणि इन्कम असल्यामुळे हे उद्दिष्टे कोल्हापूरला दिले आहे. आणि येत्या पाच वर्षात हे उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचा आहे. यासाठी दहा तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्च महिन्याचे नवीन बचत करण्यासाठी डीपी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्याला पुण्याला आमंत्रित केल आहे. जो आराखडा पाचशे कोटींचा झाला आहे तो 1000 कोटींचा करावा अशी मागणी आम्ही बैठकीत करणार आहोत. ही मागणी पूर्ण झाल्यास कोल्हापुरातील विकास कामाला चांगली चालना मिळेल असे हसन मुश्रीफ म्हणाले.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन करण्याच्या उद्दिष्टात कोल्हापूरचा सहभाग - पालकमंत्री हसन मुश्रीफ
|