बातम्या

कोल्हापूर - रत्नागिरी महामार्ग 12 तास बंद

Kolhapur  Ratnagiri highway closed for 12 hours


By nisha patil - 1/7/2023 12:47:50 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : मुसळधार पावसात रत्नागिरी मिर्‍या-नागपूर महामार्गावर रात्री नाणीज हायस्कूलजवळ तीन ट्रक व बोलेरो पिकअप गाडी टप्प्याटप्प्याने रस्त्यात पडलेल्या चरीत फसल्याने तब्बल 12 तास रस्ता बंद पडला होता.नव्या रस्त्याचे काम करणार्‍या रवी इन्फ्रा ठेकेदाराचा निष्काळजीपणा या घटनेस कारणीभूत ठरल्याचा आरोप नाणीज ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाल्याने येथील वाहतूक धोकादायक ठरत आहे. सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान तब्बल 12 तासांनी या मार्गावरून वाहतूक सुरळीत झाली.
 


कोल्हापूर - रत्नागिरी महामार्ग 12 तास बंद