बातम्या
कोल्हापूर भाजपकडून जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ हटवण्याची मागणी: अजित ठाणेकर
By nisha patil - 7/8/2023 7:48:36 PM
Share This News:
कोल्हापूर महानगरपालिकेला गेल्या अडीच महिन्यांपासून आयुक्त नाही आता कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तसेच काळजीवाहू आयुक्त राहुल रेखावार यांनाच हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. कोल्हापूर भाजपकडून जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजप नेते अजित ठाणेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हटवा, अशी मागणी केली आहे. कोल्हापूर मनपा प्रशासकांची 2 जून रोजी बदली झाल्यापासून महापालिकेचे काळजीवाहू आयुक्त म्हणून जबाबदारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा कार्यभार आहे.
अजित ठाणेकर म्हणाले की, जिल्हाधिकारी रेखावर यांच्या कार्यावर आमचा आक्षेप आहे. शिवाय यावर्षी पुन्हा एकदा महापूर येऊन नागरिकांना आपत्तीला तोंड द्यावा लागेल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. त्यानंतर अनेकांचे स्थलांतर केले. त्यामुळे भीतीचं वातावरणही निर्माण झाले होते. यामागे नेमकं काय कारण आहे? असा सवाल सुद्धा भाजप नेते अजित ठाणेकर यांनी केला आहे. अंबाबाई मंदिरात सुद्धा गरुड मंडपात विधी बंद आहेत. मंडप दुरुस्तीबाबत उद्याप काहीही पावले उचलली नाहीत, मंडप तत्काळ सुरू करावा. कारण आता नवरात्रोत्सव सुद्धा जवळ येत आहे, असेही ठाणेकर यांनी म्हटलं आहे.
पत्रकात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी रेखावार यांनी जुलै महिन्यात हवामान खात्याच्या अंदाजाचा आधार घेऊन कोल्हापुरात महापूर येणार, अशी आवई उठवली आणि जिल्ह्यात दहशत निर्माण केली. महाद्वार रोडवरील अनेक दुकाने आणि व्यवसाय धोकादायक इमारतीच्या नावाखाली बंद पाडले. याच रस्त्यावर अवैध बांधकामे व बेकायदेशीर लॉजिंग, यात्री निवास सुरू आहेत. मात्र, परवानाधारकांवर दंडेलशाही केली जात आहे. शहरातील सुमारे 60 व्यवसाय 10 दिवस बंद ठेवले.
त्यांचा अट्टाहास हा मंदिरातील वातावरण क्लुषित करतोय
देवस्थान समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनामध्ये सुरू झालेली भक्तांची दर्शनाची संग, अनेक भक्तांनी तक्रार करूनही अजून घंटा चौकातून पुढे जात आहे आणि देवस्थान समितीच्या काही खास पाहुण्यांना मात्र गाभाऱ्यात नेऊन दर्शनाची व्यवस्था केली जात आहे. देवस्थानामधील धार्मिक विधी कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडतील याची काळजी घेणे अपेक्षित असताना नवनवीन परंपरा सुरू करण्याचा त्यांचा अट्टाहास हा मंदिरातील वातावरण क्लुषित करीत आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिव पदावरून शिवराज नाईकवाडे यांना तडकाफडकी बाजूला केल्यानंतर राहुल रेखावार वादाच्या केंद्रस्थानी आले होते.
कोल्हापूर भाजपकडून जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ हटवण्याची मागणी: अजित ठाणेकर
|