बातम्या
कोल्हापूर ग्रंथोत्सव २०२५ ला इचलकरंजी येथे सुरुवात
By nisha patil - 6/2/2025 7:21:08 PM
Share This News:
देशाला स्वातंत्र्य मिळते तसे माणसातील स्वातंत्र्य मिळविण्यासाठी पुस्तके काम करतात. पुस्तके समृद्ध असून ग्रंथ चळवळ वाढविण्यासाठी गावागावात ग्रंथालय आहेत आता प्रत्येक घराघरात ग्रंथालय व्हावं अशी इच्छा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, कृष्णात खोत यांनी व्यक्त केली. त्यांच्या हस्ते इचलकरंजी येथे कोल्हापूर ग्रंथोत्सव २०२४चे उद्घाटन संपन्न झाले.
अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या ग्रंथोत्सवामध्ये दोन दिवस चांगल्या कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे सांगून या ग्रंथोत्सवासाठी विद्यार्थ्यांचाही सहभाग वाढवावा असे सांगितले. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी असे विविध उपक्रम येणाऱ्या काळात वाढवून त्यांना प्रोत्साहन द्यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी साहित्यिक कृष्णात खोत यांचा साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष सन्मान केला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. सुशांत मगदूम, यांच्यासह कोल्हापूर ग्रंथोत्सव २०२४ जिल्हा समन्वय समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.
कोल्हापूर ग्रंथोत्सव २०२५ ला इचलकरंजी येथे सुरुवात
|