बातम्या
कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे काम आदर्शवत – संजीवजी निकम
By nisha patil - 10/22/2024 6:43:37 PM
Share This News:
कोल्हापूर/वार्ताहर: कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे काम अत्यंत आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष संजीवजी निकम यांनी काढले. ते आंबेवाडी, ता. करवीर येथील गुरुकृपा सांस्कृतिक भवनात आयोजित राज्य कार्यकारिणी त्रेमासिक सभा, सत्कार सोहळा आणि मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांनी भूषवले होते.
कार्यक्रमात राज्य सरचिटणीस सुचित घरत यांच्या उपस्थितीत संजीवजी निकम यांनी ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या वेतनश्रेणी, जुनी पेन्शन योजना आणि उपदान मंजुरी बाबत उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर उमेशचंद्र चिलबुले यांनी संघटना बळकट करण्यासाठी योगदान देण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी आदर्श ग्रामपंचायत अधिकारी आणि सेवानिवृत्त ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात 34 जिल्ह्यांतील जिल्हा अध्यक्ष, सरचिटणीस आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. त्यांचा कोल्हापूरच्या आई श्री महालक्ष्मी प्रतिमा, छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिमा, कोल्हापुरी गूळ, कापडी पिशवी, आणि पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी जिल्हा अध्यक्ष एन. के. कुंभार आणि त्यांच्या टीमने केलेल्या नियोजनबद्ध कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले.
यावेळी माजी जिल्हा सरचिटणीस के. टी. सिताप, जिल्हा अध्यक्ष एन. के. कुंभार आणि जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत सूर्यवंशी यांचा राज्य संघटनेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. राज्य कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी आणि तालुका कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी व सभासद या सोहळ्याला उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचा मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला.
कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे काम आदर्शवत – संजीवजी निकम
|