बातम्या

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माऊंटेनियरिंग असोसिएशनतर्फे जागतिक पर्वतदिन साजरा..

Kolhapur District Mountaineering Association celebrates World Mountain Day


By Administrator - 11/12/2024 4:15:45 PM
Share This News:



कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माऊंटेनियरिंग असोसिएशनतर्फे जागतिक पर्वतदिन साजरा..

कात्यायनी डोंगर येथे पर्वत पूजन उपक्रमाचे आयोजन

अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमर अडके होते

 ११ डिसेंबर रोजी जागतिक पर्वतदिनानिमित्त कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माऊंटेनियरिंग असोसिएशनच्या वतीने कात्यायनी डोंगर येथे पर्वत पूजन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील गिर्यारोहण आणि साहस क्रीडांसाठी कार्यरत असलेल्या संस्थांनी एकत्र येऊन या विशेष कार्यक्रमात सहभाग घेतला.कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे उपाध्यक्ष हेमंत साळोखे यांच्या प्रास्ताविकाने झाली. प्रमुख उपस्थिती जेष्ठ गिर्यारोहक विनोद कांबोज यांची होती, तर अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमर अडके होते.डॉ. अमर अडके यांनी पर्वतदिनाचे महत्व सांगताना पर्वतांचे पर्यावरणीय आणि सांस्कृतिक योगदान उलगडले. त्यांनी नमूद केले की, "पर्वतीय परिसंस्था मानवी जीवनाचा आधार आहे. येथील पाणलोट क्षेत्रामुळे नद्या प्रवाही राहतात आणि त्यावरच शेती व जलस्रोत अवलंबून असतात. कात्यायनी डोंगरातून जयंती नदी उगम पावते, परंतु मानवी हस्तक्षेपामुळे तिचा प्रवाह प्रदूषित होत आहे. डोंगर व टेकड्यांचे नैसर्गिक स्वरूप टिकवणे आवश्यक आहे."


कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माऊंटेनियरिंग असोसिएशनतर्फे जागतिक पर्वतदिन साजरा..