बातम्या

कोल्हापूर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था डॉ.महेश कदम यांचा गोकुळतर्फे सत्कार

Kolhapur Divisional Co Registrar Cooperative Dr Mahesh Kadam felicitated by Gokul


By nisha patil - 7/17/2024 4:03:52 PM
Share This News:



गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये डॉ.महेश कदम यांची विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था कोल्हापूर, विभाग (कोल्हापूर,सांगली,सातारा) या पदावरती पदोन्नती झालेबद्द्ल गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्‍या हस्‍ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत प्रधान कार्यालय,गोकुळ शिरगाव येथे सत्कार करण्‍यात आला.सत्‍कारावेळी बोलताना डॉ.महेश कदम म्हणाले की, आदर्श व्यवस्थापन व उत्तम गुणवत्ता म्हणजेच गोकुळ असून गोकुळचा उल्लेख देशभरात सहकारातील एक आदर्श संस्था म्हणून आवर्जून केला जातो.  उपनिबंधक (दुग्ध) या पदावर कार्यरत असताना गोकुळ सोबत काम करताना खूप अभिमान, आनंद आणि समाधानाचा प्रत्यय आल्याचे ते म्हणाले. यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की दूध उत्पादक शेतकरी, ग्राहक यांचे हित व  सहकारातील मार्गदर्शक तत्वांची जपणूक करत, गोकुळची वाटचाल चालू आहे. डॉ.महेश कदम यांनी गोकुळ दूध संघास शासन स्तरावर सर्वोतपरी मदत व मार्गदर्शन करावे. यावेळी त्यांना गोकुळ परिवारातर्फे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


कोल्हापूर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था डॉ.महेश कदम यांचा गोकुळतर्फे सत्कार