बातम्या

कोल्हापुर लोकसभा निवडणूकीचा डंका वाजणार..!

Kolhapur Loksabha election will ring


By nisha patil - 3/29/2024 2:16:32 PM
Share This News:



 लोकसभा निवडणुकीचा पडघम सर्वत्र वाजत असताना याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील लोकसभा निवडणूक  चर्चेचा विषय ठरला आहे.. महाविकास आघाडीतून   छत्रपती शाहू महाराज यांच्या नावावर  शिक्कामोर्तब झाल्यानंतर शाहू महाराजांच्या विरुद्ध कोण उभा राहणार याकडे संपूर्ण राज्याचं  लक्ष लागून राहिलं होतं. सर्वप्रथम शाहू महाराजांच्या विरुद्ध संजय मंडलिकच लोकसभा निवडणूक लढवणार याची चर्चा सुरू होती परंतु त्यानंतर महायुतीकडून राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या नावाची ही चर्चांनी जोर धरला होता. यासाठी महायुती आणि समरजसिंह घाटगे यांच्या बैठका झाल्याचीही माहिती समोर आली होती.पण आता त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून . कोल्हापुरातून विद्यमान खासदार संजय मंडलिकच छत्रपती शाहू महाराजांच्या विरुद्ध लोकसभा रिंगणात भिडणार आहेत.
   

 कोल्हापूर नंतर हातकलंगले लोकसभा मतदारसंघाकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागून राहिलं होतं. 
विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही? हा प्रश्न सर्वांना उपस्थित झाला होता.

 

कारण हातकलंगले मधून शौमीका महाडिक महायुतीकडून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण काल महायुतीने या चर्चांना पूर्ण विराम देत कोल्हापूर लोकसभा मतदान संघातून शिवसेना विद्यमान खासदार संजय मंडलिक तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार धैर्यशील मानेच निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. धैर्यशील माने यांच्या विरुद्ध रिंगणात  स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून राजू शेट्टी  उतरणार आहेत. राजू शेट्टी हे अपक्ष निवडणूक लढवणार असून त्यांना महाविकास आघाडी निवडणुकीत साथ देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे
 त्यामुळे आता कोल्हापुरात शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक आणि राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने अशी लढत पाहायला मिळणार आहे त्यामुळे यंदाची कोल्हापूर लोकसभा निवडणूक चुरशीची ठरणार यात काही शंका नाही ...


कोल्हापुर लोकसभा निवडणूकीचा डंका वाजणार..!