बातम्या

टाइम्स स्क्वेअरवर झळकले कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर...

Kolhapur MLA Rajesh Kshirsagar spotted at Times Square


By Administrator - 11/30/2024 1:16:45 PM
Share This News:



टाइम्स स्क्वेअरवर झळकले कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर...

बोस्टनहून चाहत्यांचे शुभेच्छा संदेश..

कोल्हापूरचे नूतन आमदार राजेश क्षीरसागर यांचा फोटो  न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरच्या भव्य बिलबोर्डवर झळकला आहे. त्यांच्या निवडीचा उत्सव जागतिक स्तरावर साजरा करण्यात आला असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत असून तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय.बोस्टन सिटी येथे राहणारे रोहन घोरपडे यांनी आमदार क्षीरसागर यांना भावनिक शुभेच्छा देत म्हटले की, “त्यांच्या नेतृत्वाला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी मिळेल, असा आमचा ठाम विश्वास आहे. त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी आम्ही प्रार्थना करतो.”


टाइम्स स्क्वेअरवर झळकले कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर...