बातम्या

कोल्हापूर नाका व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर इचलकरंजीत हायमास्ट दिव्याचे उद्घाटन; ढोल वादन स्पर्धेचे आयोजन

Kolhapur Naka and Dr Inauguration of Babasaheb Ambedkar Nagar Ichalkaranjit High Mast Lamp


By nisha patil - 3/9/2024 9:23:57 PM
Share This News:



नितेश उर्फ गोट्या भाऊ पोवार यांच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य ढोल वादन स्पर्धा व लोकप्रिय आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे मा. मुख्यमंत्री यांच्या अर्थसहाय्याने महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतुद या योजनेतून नवीन कोल्हापूर नाका, डॉ बाबसाहेब आंबेडकर नगर इचलकरंजी येथे बसवण्यात आलेल्या हायमास्ट दिव्याचे उदघाट्न मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.

यावेळी माजी नगरसेविका लक्ष्मी पोवार, माजी नगरसेवक राजू बोंद्रे, ताराराणी युवा अध्यक्ष सतीश मुळीक, माजी पाणीपुरवठा सभापती दिपक सुर्वे, भारत बोंगार्डे, इम्रान मकानदार शीला सुतार, जोती पाटील, संगीता कांबळे, मंगल सुतार, शिल्पा सुतार, रंजना मडगावे, शारदा चौगुले, माधुरी म्हेत्रे, शावंत मावशी, कोथमिरे वहिनी, कंगार काकी, कांबळे मावशी, झेंडे वहिनी यांच्यासह भागातील युवा कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक व महिला उपस्थित होते.


कोल्हापूर नाका व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर इचलकरंजीत हायमास्ट दिव्याचे उद्घाटन; ढोल वादन स्पर्धेचे आयोजन