बातम्या

कोल्हापूर : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी

Kolhapur Orange alert issued in the district till Thursday


By nisha patil - 4/7/2023 12:21:22 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : हवामान विभागाने जिल्ह्यात येत्या गुरुवार (ता. ६) पर्यंत तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. या काळात जिल्ह्यातील काही भागात सुमारे १०० ते २०४ मिलीमीटर इतका पाऊस होण्याची शक्यता आहे, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.दरम्यान, जिल्ह्यात पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असला तरी अन्यत्र मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळी वाढ होत आहे. महापालिकेने शिंगणापूर बंधाऱ्याचे बर्गे काढले नसल्याने सकाळी बंधारा पाण्याखाली गेला.
 


कोल्हापूर : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी