बातम्या
भाजपा सदस्यता नोंदणी अभियानामध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ यशस्वी..
By Administrator - 2/17/2025 4:40:13 PM
Share This News:
भाजपा सदस्यता नोंदणी अभियानामध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ यशस्वी..
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेनीं दिली कौतुकाची थाप...
कौतुकाची थाप सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दहा हत्तींचे बळ देणारी...
भाजपा सदस्यता नोंदणी अभियानामध्ये पश्चिम महाराष्ट्रात आघाडी घेण्यात आ.अमल महाडिकांचा कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ यशस्वी ठरला आहे. कार्यकत्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी कौतुक केले.
भाजपा सदस्यता नोंदणी अभियानामध्ये पश्चिम महाराष्ट्रात आघाडी घेण्यात आ.अमल महाडिकांचा कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ यशस्वी ठरलाय. दिलेल्या उद्दिष्टाच्या तब्बल 96% नोंदणी करत भारतीय जनता पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, बूथ प्रमुख आणि कार्यकर्ते यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी कौतुक केले. यावेळी आ.अमल महाडिक म्हणाले, त्यांनी दिलेली ही कौतुकाची थाप नक्कीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दहा हत्तींचे बळ देणारी आहे.
यावेळी प्रभारी प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद जी देशपांडे , प्रदेश महामंत्री राजेशजी पांडे, प्रदेश महासचिव आ. विक्रांत बाळासाहेब पाटील, प्रदेश महामंत्री विजय चौधरी,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील , खासदार धनंजय महाडिक, आदी मान्यवरांसह कोल्हापूर, सांगली,सातारा,आदी जिल्हातील भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपा सदस्यता नोंदणी अभियानामध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ यशस्वी..
|