बातम्या
कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा १५ डिसेंबरपासून बंद...
By nisha patil - 11/30/2023 4:58:51 PM
Share This News:
कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा १५ डिसेंबरपासून बंद...
स्थानिक व्यवस्थापनाला वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना...
१ लाख १६ हजार ३११ जणांचा प्रवास...
कोल्हापूर तिरुपती विमान सेवा गेल्या काही दिवसापासून बंद होणार आहे याबाबत सुरू असलेल्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
गेली साडेचार वर्षे व्यवस्थित सुरू असलेली कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा दि. १५ डिसेंबरपासून बंद होणार आहे. कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापनाला वरिष्ठ कार्यालयाकडून मंगळवारी तसे सांगण्यात आले. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सेवा बंद होणार याबाबत सुरू असलेल्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे. कोल्हापूर विमानतळाचा विकास वेगाने सुरू असताना, नव्या सेवा सुरू होण्याऐवजी आहे त्या बंद होऊ लागल्या आहेत. यामुळे कोल्हापूरची राजकीय ताकद आहे की नाही, असा सवाल कोल्हापूरकर उपस्थित करत आहेत.कोल्हापूर-तिरुपती मार्गावर १२ मे २०१९ पासून सेवा सुरू झाली. कोरोना काळात काही दिवस ती बंद होती. यानंतर काही महिने आठवड्यातून चार दिवस ती सुरू होती. १२ मे २०१९ ते २० नोव्हेंबर २०२३ अखेर २ हजार २२५ उड्डाणांमधून १ लाख १६ हजार ३११ जणांनी प्रवास केला आहे.अपेक्षित प्रवासी संख्या नसल्याचे कारण देत सेवा बंद करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. कंपनीकडून मात्र, अधिकृतपणे तसे जाहीर केलेले नाही. वास्तविक, या मार्गावर सरासरी प्रवासी संख्या चांगली आहे.प्रारंभी या मार्गावर ३ हजार रुपये तिकीट दर होता, नंतर तो वाढला. सरासरी ३ हजार हा तिकीट दर ग्राह्य धरला, तरी या मार्गावर कंपनीला तब्बल ३५ कोटींहून अधिकचा या महसूल कालावधीत मिळाला आहे. अपेक्षित प्रवासी नसल्याचे कारण सेवा बंद करण्यामागे दिले जात आहे. या मार्गावर ७२ आसनी विमान आहे. या मार्गावरील प्रवासी संख्या विचारात घेता, प्रत्येक फ्लाईटला सरासरी ५२ प्रवासी म्हणजे क्षमतेच्या ७२ टक्के प्रवासी मिळाले आहेत. असे असतानाही अपेक्षित प्रवासी नाहीत, हे कारण अनाकलनीय आहे.
कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा १५ डिसेंबरपासून बंद...
|