बातम्या

कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी उत्तम वावरे

Kolhapur Zilla Parishad Employees Cooperative Society Chairman Uttam Vavre


By nisha patil - 2/13/2024 7:47:29 PM
Share This News:



कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी उत्तम शंकर वावरे व व्हा. चेअरमनपदी सचिन भिकाजी गुरव यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यासी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर प्रेरणा शिवदास या होत्या. 

चेअरमन पदासाठी  उत्तम वावरे यांना अमर पाटील सुचक व  सरदार दिंडे यांनी अनुमोदन दिले.तसेच व्हा. चेअरमन पदासाठी  सचिन गुरव यांना अजय शिंदे सुचक व  श्रीकांत चव्हाण यांनी अनुमोदन दिले. संस्थेने चांगल्या प्रकारे आर्थिक गरुड झेप घेतली असून संस्थेच्या सभासदांचे हिताचे काम करण्यास आम्ही सर्व संचालक व सुकाणू समिती कटिबद्ध आहोत. भविष्यात संस्थेच्या नावलौकीकात वाढच होत जाईल व त्यामध्ये भरीव वाढ करण्यासाठी  निश्चीत नियोजनबद्द काम करण्याची ग्वाही दिली. तसेच यापुढेही संस्थेचा कारभार सुकाणू समितीच्या मार्गदर्शनानुसार व सर्व संचालकांच्या सहकार्याने सभासदांच्या हिताचा व पारदर्शकपणे काटकसरीने करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे नुतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांनी निवडीच्या वेळी सांगितले.

निवडीवेळी संचालक रणजित पाटील, मुजम्मिल नावळेकर, अमर पाटील, जितेंद्र वसगडेकर, राहुलराज शेळके, सुरेश सुतार, रविंद्र जरळी, अजय शिंदे, संजय शिंदे, श्रीकांत चव्हाण, सुनिल पाटील, बाजीराव पाटील, सरदार दिंडे, नंदिप मोरे, साताप्पा मगदूम, जयकुमार रेळेकर, सुधाकर कांबळे, सरोजिनी कोरी, सोनाली गुरव, तज्ञ संचालक नारायण आयरे, पांडूरंग पोवार संस्थेचे मार्गदर्शक  एम. आर. पाटील, विश्वास साबळे, महावीर सोळांकुरे, राजीव परीट, राजाराम वरुटे, एम. एम. पाटील, के. आर. किरुळकर, मनोहर भाट, सात्ताप्पा मोहिते, अजित मगदुम, शांताराम माने, विजय टिपुगडे, रविकुमार पाटील, प्रतिभा शिर्के, एन. डी. पाटील, अनिल आवळे, किरण मगदूम, दगडू परीट ,मुख्य कार्यकारी अधिकारी विजय बोरगे आदी उपस्थित होते.


कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी उत्तम वावरे