बातम्या
महावितरण राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत कोल्हापूर परिमंडल अजिंक्य
By nisha patil - 11/2/2025 8:18:17 PM
Share This News:
महावितरण राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत कोल्हापूर परिमंडल अजिंक्य
१४ सुवर्ण, २२ रौप्य पदकांची शानदार कमाई
कोल्हापूर, दि. ११ फेब्रुवारी २०२५: महावितरणच्या २०२४-२५ राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर परिमंडल संघाने उत्कृष्ट कामगिरी करत सर्वसाधारण अजिंक्यपद पटकावले. संघाने १४ सुवर्ण व २२ रौप्य पदकांची कमाई केली.
बारामती येथील विद्यानगरी क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातून ११०० खेळाडूंनी सहभाग घेतला. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील १६४ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी, त्यात ४० महिलांनी, सहभाग नोंदवला.
सांघिक विजेते – क्रिकेट (पुरुष), टेनिक्वाईट (महिला)
सांघिक उपविजेते – व्हॉलिबॉल, खो-खो (पुरुष), बॅडमिंटन (पुरुष), कॅरम (महिला)
महत्त्वाचे व्यक्तिगत विजेते – अमित पाटील (भाला फेक, शरीरसौष्ठव), सतीश पाटील (उंच उडी), अतुल दंडवते (टेबल टेनिस), गुरुप्रसाद देसाई (कुस्ती - ७४ किलो), सलमान मुंडे (९० किलो+ शरीरसौष्ठव)
विजेत्यांना महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. मुख्य अभियंता स्वप्नील काटकर आणि इतर अधिकाऱ्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
महावितरण राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत कोल्हापूर परिमंडल अजिंक्य
|