बातम्या
कोल्हापूर 180 गावांमध्ये दूषित पाणी
By nisha patil - 6/30/2023 12:58:28 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम : जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केलेल्या पाणी सर्वेक्षणात जिल्ह्यातील 180 गावांचे पाणी दूषित आढळून आले असून त्यांना पिवळे कार्ड दिले आहे. जिल्ह्यात तीन ते चार गावांमधील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे आढळून आले असून त्यापैकी किसरूळ (ता.
पन्हाळा) ग्रामपंचायतीला लाल कार्ड देण्यात आले आहेजिल्हा परिषद आरोग्य विभागाने 1 हजार 25 ग्रामपंचायतींमधील 3 हजार 403 पाण्याच्या स्रोतांची तपासणी केली. जिल्हा प्रयोगशाळेतून हे पाण्याचे नमुने तपासून घेतले जातात. यामध्ये 916 गावांमधील पाणी स्वच्छ तर 180 गावांमधील पाणी दूषित आढळून आले आहे. यामध्ये सर्वाधिक 19 गावे करवीर तालुक्यातील आहेत. आजरा, गगनबावडा व शाहूवाडी तालुक्यातील प्रत्येकी एका गावामध्ये दूषित पाणी आढळून आले आहे.
कोल्हापूर 180 गावांमध्ये दूषित पाणी
|