बातम्या

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा उत्कृष्ट

Kolhapur district excels in state level taekwondo competition


By nisha patil - 6/27/2023 12:20:06 PM
Share This News:



राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा उत्कृष्ट

कोल्हापूर : दिनांक 24ते 26 जून रोजी रत्नागिरी येथे झालेल्या 33 वी ज्युनिअर राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याने उत्कृष्ट खेळ करत राज्यात कोल्हापूर जिल्ह्याला द्वितीय क्रमांकाची चॅम्पिअनशिप मिळवली.

या मध्ये कोल्हापूर संघाला एकूण 1 गोल्ड 8 रौप्य 2 कांस्य पदक किनले पैकी ऑस्टिन तायक्वांदो अकॅडेमी च्या खेळाडूंनी 1 सुवर्ण 4 रौप्य पदक जिंकून नेहमी प्रमाणे जिल्ह्याला राज्याची ट्रॉफी मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.
 

या स्पर्धेचे उदघाटन नामदार उद्योगमंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालक मंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या कडून करण्यात आले. तसेच सर्व सोयी सुविधा सुद्धा उदयजी सामंत साहेब यांच्या कडून करण्यात आल्या होत्या..


राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा उत्कृष्ट