बातम्या

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळे वळण

Kolhapur district politics took a different turn


By nisha patil - 3/7/2023 1:29:09 PM
Share This News:



तारा न्युज वेब टीम :  राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे सर्वेसर्वा आमदार हसन मुश्रीफ भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये सहभागी झाल्याने जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळणार आहे. आगामी लोकसभा, विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थेत युतीला बळ मिळेल.या निर्णयाने काँग्रेस मात्र, काहींशी एकाकी पडणार आहे. यामुळे आगामी सर्वच निवडणुकीत काँग्रेसला मोठा संघर्ष करावा लागणार आहे. राष्ट्रवादी सोबत आल्याने मात्र, भाजपाचे समरजित घाटगे, भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या समर्थकांत अस्वस्थता आहे. घाटगे यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले असून, यामुळे काही ठिकाणी अंर्तात संघर्षाचीही शक्यता आहे. एकूणच जिल्ह्याच्या आगामी राजकारणात सर्वच फासे पलटणार असेच चित्र आहे


कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळे वळण