बातम्या
कोल्हापूर जिल्ह्याची हवाई सफर हेलिकॉप्टर सुविधा, मंदिर,गड किल्ले आकाशातून पाहण्याची संधी पहिल्यांदाच आपल्या शहरात
By nisha patil - 3/27/2024 6:34:54 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्ह्याची हवाई सफर हेलिकॉप्टर सुविधा, मंदिर,गड किल्ले आकाशातून पाहण्याची संधी पहिल्यांदाच आपल्या शहरात
पन्हाळा टुरिझम यांच्या वतीने 29,30,31,मार्च 2024 या तीन दिवस हेलिकॉप्टर ची सफर कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी हा आगळा वेगळा प्रायोजिक तत्वावर याचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम आहे.जरी व्यवसायिक उपक्रम असला तरी याच एकमेव उद्दिष्ट हे लोक कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनासाठी यावेत राहावेत पर्यटन वाढ व्हावी याकरिता आहे. अविनाश इव्हिगेशन्स यांच्यावतीने शिर्डी, रायगड, राजगड,सिंधुदुर्ग,शिवनेरी, रत्नागिरी,गणपतीपुळे, सातारा, महाराष्ट्र सह गोवा या राज्यात अशा अनेक ठिकाणी पर्यटकांना हवाई दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली आहे. तरी भविष्यात लोकांच्या मागणी प्रमाणे खास करून पन्हाळा ,कोल्हापूर जिल्ह्याची हवाई सफर करता येणार आहे. नैसर्गिक वनसंपदे सह छत्रपती शिवाजी महाराजां चे गड-किल्ले यांचे वैभव पाहण्यासाठी आता हवाई सुविधा सर्वांसाठी मिळणार आहे. भविष्यात ज्या ठिकाणी मागणी असेल त्या ठिकाणी हेलिकॅप्टर देण्यात येईल असे पन्हाळा टुरिझम मॅनेजमेंटच्या वतीने,साहिल पवार,शहाबाज मुजावर ,चेतन भोसले यांनी आपल्या माध्यमाला माहिती देताना सांगितले आहे.
तसेच हे उपक्रम पार करण्यासाठी , आमदार विनय कोरे, सुमित कदम ,दिलीप मोहिते सुनील हावळ माजी नगराध्यक्ष विजय पाटील, संग्रामसिंह भोसले, रवींद्र धडेल, यांचे मोलाची सहकार्य लाभले आहे.हेलिकॅप्टर एअरबस कंपनीचे अविनाश इव्हिगेशन यांच्यामार्फत आणले आहे.या हेलिकॅप्टर मध्ये एका वेळी सहा व्यक्ती बसू शकतात. 29 तारखेपासून सकाळी 11वा 30 मिनिटांनी दर अर्धा तासाला हेलिकॉप्टर ची राईड होईल . छत्रपती शिवाजी महाराजांचा पन्हाळगड,पावनगड ऐतिहासिक किल्ल्यां बरोबरच महालक्ष्मी, ज्योतिबा मंदिर ,यांचे पर्यटकांना दर्शन घेता येईल
हेलिकॉप्टर राईट ची सुरुवात अंबप येथे मोहिते हेलिपॅड इथून उडान घेऊन हे हेलिकॅप्टर, महालक्ष्मी मंदिर, महाद्वार रोड, रंकाळा, पंचगंगा नदी, जोतिबा मंदिर, पावनगड, व पन्हाळगड अशी होईल. पुन्हा मोहिते यांच्या हेलिपॅड वर उतरेल. ही राईट वीस ते पंचवीस मिनिटांची असेल, याकरता पन्हाळा टुरिस्ट मॅनेजमेंट यांनी आठ हजार पाचशे प्रति व्यक्ती जी एस टी सह तिकीट ठेवले आहे. दिवसातून दहा ते बारा राईट होतील तसेच या तीन दिवसात 288 पर्यटकांना या हवाई सफरीचा आनंद घेता येईल.
ज्या पर्यटकांना या संधीचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी खालील नंबर वर आपले नाव नोंदणी करावी.7875381638, 9763999097, 7507502299, असे आवाहन पन्हाळा टुरिस्ट मॅनेजमेंटच्या वतीने करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्याची हवाई सफर हेलिकॉप्टर सुविधा, मंदिर,गड किल्ले आकाशातून पाहण्याची संधी पहिल्यांदाच आपल्या शहरात
|