बातम्या
कोल्हापूर हायकर्सचा प्रजासत्ताक दिनी कळसुबाई शिखरावर ध्वजारोहण
By nisha patil - 1/31/2025 7:42:19 PM
Share This News:
कोल्हापूर हायकर्सचा प्रजासत्ताक दिनी कळसुबाई शिखरावर ध्वजारोहण
कोल्हापूर: कोल्हापूर हायकर्सने यंदाच्या प्रजासत्ताक दिनी कळसुबाई शिखरावर ध्वजारोहण करून खास अनुभव साजरा केला. २५-२६ जानेवारी रोजी आयोजित केलेल्या ट्रेकमध्ये हायकर्सने कळसुबाई शिखरावर तिरंगा फडकवला, ज्यामुळे सर्व सदस्यांच्या चेहऱ्यावर देशप्रेम आणि आनंद दिसला.
हा ट्रेक शारीरिक आणि भावनिक दृषटिकोनातून एक अनोखा अनुभव होता. कळसुबाईच्या शिखरावर देशप्रेम, साहस आणि एकतेची भावना व्यक्त केली गेली. ट्रेकमध्ये सहभागी गिर्यारोहकांमध्ये सागर श्रीकांत पाटील, संतोष शिंदे, माया शिंदे आणि इतर अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
कोल्हापूर हायकर्सचा प्रजासत्ताक दिनी कळसुबाई शिखरावर ध्वजारोहण
|