बातम्या
कोल्हापुरात पावसाची रिपरिप, पण पाणीपुरवठा करणारा कळंबा तलाव अजूनही तहानलेलाच
By surekha - 12/7/2023 4:21:11 PM
Share This News:
कोल्हापुरात पावसाची रिपरिप, पण पाणीपुरवठा करणारा कळंबा तलाव अजूनही तहानलेलाच
कोल्हापूरला पाणीपुरवठा करणारा कळंबा तलाव अजूनही तहानलेला आहे. गेल्यावर्षी याचदिवशी कळंबा तलाव 70 टक्क्यांहून अधिक तलाव भरला होता. यंदा मात्र केवळ मृतसाठा असून त्यामध्ये किंचित वाढ झाली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.मात्र, कोल्हापूर शहरासह उर्वरित तालुक्यांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.मात्र, कोल्हापूरला पाणीपुरवठा करणारा कळंबा तलाव अजूनही तहानलेला आहे.गेल्यावर्षी याचदिवशी कळंबा तलाव 70 टक्क्यांहून अधिक तलाव भरला होता.25 जुलै 2022 रोजी कळंबा तलावाच्या सांडव्यावरून पाणी बाहेर पडल्याने, पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.यंदा मात्र कळंबा तलावात केवळ मृतसाठा असून त्यामध्ये किंचित वाढ झाली आहे.कोल्हापूर शहर आणि शिरोळ, हातकणंगले, करवीर तसेच कागल तालुक्यात अपेक्षित पाऊस अजूनही झालेला नाही.पावसाच्या रिपरिपने पीकांना जीवदान मिळाले असले, तरी धरणांमध्ये पाणीसाठा होण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीवरील सात बंधारे पाण्याखाली आहेत, तर भोगावती नदीवरील दोन बंधारे पाण्याखाली आहेत.
कोल्हापुरात पावसाची रिपरिप, पण पाणीपुरवठा करणारा कळंबा तलाव अजूनही तहानलेलाच
|