बातम्या

उद्यापासून कोल्हापूरकरांना मिळणार एक दिवसाआड पाणी

Kolhapur residents will get water once a day from tomorrow


By nisha patil - 6/14/2023 4:37:45 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी  गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी झाली आहे .त्याचबरोबर राधानगरी धरणात पाणीसाठा कमी आहे. महापालिकेच्या मागणीवरून पाटबंधारे विभागाकडून कोल्हापूरला पाणीपुरवठ्यासाठी योग्य प्रमाणात पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. मात्र पाऊस लांबण्याची शक्यता गृहीत धरून उद्या 15 जून पासून कोल्हापूर शहरासह संलग्नित उपनगरात एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. सध्या महापालिकेच्या उपसा केंद्रातून पाणीपुरवठा सुरळीत सुरू इतकी पाणी पातळी आहे. मात्र पाऊस लांबला तर अडचणी निर्माण व्हायला नको. यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या राधानगरी धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्जनुसार 22 ते 25 दिवस पाणी पुरणार आहे. असेही सरनोबत यांनी स्पष्ट केले.


उद्यापासून कोल्हापूरकरांना मिळणार एक दिवसाआड पाणी