बातम्या
पाच महिन्यात कोल्हापूर ला अजुनही सरळ पाणी नाही - धनंजय महाडिक
By nisha patil - 10/3/2024 10:09:19 PM
Share This News:
पाच महिन्यात कोल्हापूर ला अजुनही सरळ पाणी नाही - धनंजय महाडिक
कोल्हापूर - प्रतिनिधी कोल्हापुरात. श्रेयवाद घेण्याची खूप लोकांना सवय आहे. एकट्यानेच आंघोळ केली, आता थेट पाईपलाईनच्या पाण्यात महाडिक मारणार उडी! कोल्हापूरच्या जिव्हाळ्याची समजली जाणारी थेट पाईपलाईन योजना अखेर सुरू झाली आहे. माजी पालकमंत्री आणि आमदार सतेज पाटील यांनी पाणी उद्धाटन केले. काही महिन्यातच कोल्हापूरकरांना थेट पाईपलाईन द्वारे काळम्मावाडी धरणातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र त्यावर आता राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक प्रतिक्रिया देत थेट पाईपलाईनच्या पाण्यात आता आपण स्वतः लक्ष घालणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
आज कोल्हापूर विमानतळा येथील नवीन टर्मिनल बिल्डिंगचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पार पडले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. उद्घाटन सोहळा संपल्यानंतर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली आहे. सध्या कोल्हापूर विमानतळावरून श्रेयवादाचे राजकारण सुरु झाले आहे. त्यावर बोलताना धनंजय महाडिक यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
कोल्हापुरात श्रेयवाद घेण्याची खूप लोकांना सवय आहे. आम्ही या विमानतळाबाबत किती कष्ट घेतले हे जनतेला माहिती आहे. दुसऱ्याने श्रेय किती घ्यायचे हे त्यांचे त्यांनी ठरवावे. वीस वर्षे कोल्हापुरातील विमानसेवा बंद होती. मात्र मंत्री असताना त्यांना देखील ते करणे शक्य झाले नाही. विमानतळ परवानगीची फाईलसुद्धा तयार केली नव्हती. असा टोला काँग्रेसच्या नेत्यांना लगावत शंभर वेळा मी डीजीसी कडे जाऊन परवानगी आणल्या आहेत. मला आत्मिक समाधान आहे. मला वैयक्तिक आनंद होत आहे की, याचे काम आपण पूर्ण केले, अशी प्रतिक्रिया धनंजय महाडिक यांनी दिली.
ते सत्तेत होते त्यांना असं वाटत होते की महाडिक कधीही सत्तेत येणार नाही. विमान हवेतच घिरट्या घालते, बास्केट ब्रिज ही संकल्पनाच नाही, अशा पद्धतीने आमच्यावर टीका झाली. मात्र भाजपकडून मी खासदार झाल्यानंतर बास्केट ब्रिजचे काम सुरू झाले. आता गिरट्या घालणारे विमान नाही तर सहा ठिकाणी विमानसेवा कोल्हापुरातून सुरू आहे. अजून पाच ठिकाणी विमानसेवा सुरू होईल. आंतरराष्ट्रीय विमान येथून निघतील यासाठी माझा प्रयत्न असणार आहे, अशी प्रतिक्रिया धनंजय महाडिक यांनी दिली.
थेट पाईपलाईनवरून त्यांनी भाष्य केले. 'ज्याचं श्रेय त्यांनी घ्यावं असा माझा नेहमीच समज आहे. पण आता मी थेट पाईपलाईनच्या कामात लक्ष घालणार आहे. पाईपलाईनचे उद्घाटन करून पाच महिने झाले पण लोकांना पाणी मिळाले नाही.दिवाळीची आंघोळ जाऊन एकट्यानेच केली. मात्र आज अखेर थेट पाईपलाईनचे पाणी कोल्हापूरकरांना मिळालेले नाही. कोल्हापुरातील लोक कळशी आणि घागर घेऊन आंदोलन करताना दिसत आहेत, असे ते म्हणाले.
"महापालिकेतील अधिकारी गळतीचे कारण देतात, अजूनही चित्र स्पष्ट नाही. कोल्हापूरला थेट पाईपलाईनचे पाणी अजूनही मिळत नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. ते पाणी मिळण्यासाठी आता मी पुढाकार घेणार आहे. थेट पाईपलाईनच्या सर्व कामांना मी भेट देणार आहे. लोकांना पाणी मिळण्यासाठी जर राज्य किंवा केंद्र सरकारकडून निधी लागणार असेल तर मी त्यासाठी पाठपुरावा करणार. त्यांना संधी दिली पाच सहा महिने झाले पण अजून लोकांना पाणी मिळालेले नाही," अशा शब्दात धनंजय महाडिक यांनी थेट पाईपलाईन वरून टीका केली आहे.
पाच महिन्यात कोल्हापूर ला अजुनही सरळ पाणी नाही - धनंजय महाडिक
|