बातम्या

कोल्हापूर चित्रनगरीत भव्य चित्रपट वस्तुसंग्रहालय उभारणार 

Kolhapur will set up a grand film museum in Chitranagari


By nisha patil - 11/2/2025 3:20:38 PM
Share This News:



कोल्हापूर चित्रनगरीत भव्य चित्रपट वस्तुसंग्रहालय उभारणार 

 मराठी चित्रपटसृष्टीचा ऐतिहासिक ठेवा जपला जाणार

मराठी चित्रपटसृष्टीच्या समृद्ध वारशाचे जतन करण्यासाठी कोल्हापूर चित्रनगरीत लवकरच एक भव्यदिव्य चित्रपट वस्तुसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. या संग्रहालयात चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील महत्त्वाचे दस्तऐवज, जुन्या चित्रपटांचे पोस्टर्स, कॅमेरे, वेशभूषा, स्क्रिप्ट्स यांसारख्या दुर्मीळ आठवणींचे जतन केले जाणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

संबंधित विकासकामांसाठी मंत्रालयात कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या वेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उपसचिव नंदा राऊत, सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे, तसेच पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे आदी उपस्थित होते.

चित्रपटसृष्टीच्या गौरवशाली परंपरेची माहिती जुन्या आणि नव्या पिढीला मिळावी, तसेच सांस्कृतिक पर्यटन वाढीस लागावे, यासाठी या संग्रहालयात खास चित्रफिती तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याचे निर्देश मंत्री ॲड. शेलार यांनी दिले.

कोल्हापूर चित्रनगरीच्या विकासासाठी आवश्यक पदे भरताना ‘एम एस आय डी सी’ ची मदत घ्यावी, तसेच चित्रपट क्षेत्राची उत्तम जाण असलेल्या वास्तुविशारदांची नियुक्ती बाह्य स्रोतांद्वारे करावी, असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर चित्रनगरीमध्ये सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे मराठी चित्रपटसृष्टीला एक नवे रूप मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.


कोल्हापूर चित्रनगरीत भव्य चित्रपट वस्तुसंग्रहालय उभारणार 
Total Views: 59