बातम्या

कोल्हापूरकर नवीन वर्षाच्या जयत्त तयारीत

Kolhapurkar in preparation for New Years celebration


By nisha patil - 12/30/2023 1:57:16 PM
Share This News:



कोल्हापूरकर नवीन वर्षाच्या जयत्त तयारीत

कोल्हाूपुर: सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे जल्लोषी स्वागत करण्यासाठी कोल्हापूरकर सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक हॉटेल्स मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. अनेकांनी तर घरातली विद्युत रोषणाई ही सजवल्याचे पहायला मिळत आहे.  यंदा ग्रामीण भागातील ऍग्रो टुरिझम अंतर्गत उभारण्यात आलेला रेस्टॉरंटचे  ३१ डिसेंबर साजरे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बुकिंग करण्यात आले आहे.
 

2019 ते 2021 या दोन वर्षात लॉकडाऊन मुळे नववर्षाच्या स्वागतावर मर्यादा आल्या होत्या शासनाने अनेक नियमावली जारी केल्या होत्या. नियमांचे पालन करून तेव्हा नव्या वर्षाचे स्वागत झाले यांना कोल्हापूरकर जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत करण्याची परंपरा कायम ठेवणार आहेत. शहरातील अनेक हॉटेल्स विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आहेत तरुणाईने काही सामाजिक संकल्प करत दारूचा नाहीतर ,दुधाचा असे सांगत काही ठिकाणी एक डिसेंबर रोजी दुधाचे सेवन करून नवीन वर्षाचे स्वागत होणार आहे.
 

एक डिसेंबर रोजी रविवारी असल्याने पर्यटन मोठ्या संख्येने कोल्हापुरात दाखल होण्याची शक्यता आहे. अंबाबाई दर्शन बरोबरच पन्हाळा जोतिबा येथे भेट देऊन, अनेकांनी एक डिसेंबर कोल्हापुरात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने ग्रामीण भागातील हॉटेल्स रेस्टॉरंट से मोठ्या प्रमाणात बुकिंग झाले आहेत, पॅकेज अंतर्गत वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. यंदा पहाटेपर्यंत बियर बार वाईन शॉप खुले राहणार आहेत. त्यामुळे डीजेच्या तालावर सरत्या वर्षाला निरोगीत तरुणाईचा जल्लोष साला उधान येणार आहे.


कोल्हापूरकर नवीन वर्षाच्या जयत्त तयारीत