बातम्या

कोरगांवकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची ट्रॅफिक गार्डनला भेट ; शस्त्रास्त्रांची घेतली पोलीसदलाकडून माहिती

Korgaonkar High School students visit Traffic Garden

By nisha patil - 6/1/2025 10:18:37 PM
Share This News:

कोरगांवकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची ट्रॅफिक गार्डनला भेट ; शस्त्रास्त्रांची घेतली पोलीसदलाकडून माहिती

कोल्हापूर  :आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित कोरगांवकर हायस्कूल सदर बाजारच्या आर.एस .पी.विद्यार्थ्यांनी कसबा बावडा येथील पोलीस दलाच्या ट्रॅफिक गार्डनला भेट देवून पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून शस्त्रास्त्रे चालवण्याचे नियम, घ्यावयाची काळजी आणि गोपनीयता याबाबत सर्वंकष माहिती घेतली . दक्ष श्वानपथक आणि गुन्ह्याची उकल करण्याची कार्य पद्धतीही समजावून घेतली . शहर वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार राकेश मछले, प्रकाश कुंभार तसेच श्वान पथक प्रमुखातील सदस्य विजय निकम यांनी विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली तसेच विद्यार्थीनींना निर्भया पथकाच्या कार्याबद्दल माहिती सांगितली . विद्यार्थ्यांना पोलीसदलाकडून खाऊचे वाटप करण्यात आले . यावेळी आरएसपी प्रमुख सुरेखा पोवार, विद्या बाचणकर, तृप्ती डुणूंग, शीतल गणेशाचार्य यांनी या उपक्रमाचे संयोजन केले . मुख्याध्यापक  संजय सौंदलगे, पर्यवेक्षिका प्रमिला साजणे यांनी उपक्रमाच्या यशस्वितेबद्दल सहकाऱ्यांचे आभार मानले .

कोरगांवकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची ट्रॅफिक गार्डनला भेट ; शस्त्रास्त्रांची घेतली पोलीसदलाकडून माहिती
Total Views: 37