बातम्या

कोरगांवकर हायस्कूलमध्ये प्रथम दिवशी नवागतांचे स्वागत...

Korgaonkar High School welcomes newcomers on first day


By nisha patil - 6/17/2024 8:23:48 PM
Share This News:



कोरगांवकर हायस्कूल प्रथम दिवशी नवागतांचे स्वागत आणि कोमनपा शिक्षण समिती चे पर्यवेक्षक बाळासो कांबळे यांचे हस्ते पाठ्यपुस्तक वितरणझांजपथकाच्या   निनादात आणि पुष्पवृष्टी करून कोरगांवकर हायस्कूल, सदर बाजार येथे                          

आज शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे  मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले . त्याचप्रमाणे नवीन प्रवेश असणाऱ्या विद्यार्थ्यांना साखर पेढे यांचे वाटप करण्यात आले . प्रवेशद्वाराच्या दुतर्फा उभे राहून शिक्षकांनी फुलांची उधळण केली . समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठयपुस्तकाचे वितरण कोल्हापूरमहानगर पालिकेच्या शिक्षण समितीचे पर्यवेक्षक बाळासो कांबळे आणि पालक प्रतिनिधी शिवराज कल्लोळी यांच्या हस्ते करण्यात आले . मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . राजाराम संकपाळ यांनी आभार मानले


कोरगांवकर हायस्कूलमध्ये प्रथम दिवशी नवागतांचे स्वागत...