बातम्या

कोतोलीच्या महाराष्ट्र ना. पतसंस्थेला १ कोटी ७३ लाखांचा नफा- चेअरमन डी.जी.पाटील

Kotolis Maharashtra No Profit of 1 crore 73 lakhs to the credit institution Chairman D g Patil


By nisha patil - 4/19/2024 4:33:03 PM
Share This News:



 कोतोली: प्रतिनिधी  येथील महाराष्ट्र नागरी पतसंस्थेला सन 2023 24 या आर्थिक वर्षांमध्ये एक कोटी 73 लाख इतका ढोबळ नफा झाला असल्याचे संस्थापक चेअरमन डी जी पाटील यांनी सांगितले.

यावेळी बोलताना म्हणाले की संस्थेची स्थापना समाजातील आर्थिक मागास गरजूंनी व्यक्तीं तसेच दुर्गम भागातील लोकांच्या गरजा पूर्ण करणे  झालेली आहे. चालू आर्थिक वर्षात 2023-24 मध्ये संस्थेने रुपये 623.35 कोटी इतकी वार्षिक उलाढाल झाली असून संस्थेकडे 90 कोटी ठेवी असून रुपये 65. 79 कोटी इतकी कर्जे आहेत एकूण गुंतवणूक 32.17 कोटी व स्थावर मालमत्ता रुपये 3.51 कोटी इतकी आहे. तसेच संस्थेचे रुपये 9.23 कोटी इतकी स्वभांडवल आहे. सर्व तरतुदी वजा जाता अहवाल साल अखेर संस्थेस रुपये 1.54 कोटी इतका निवळ नफा झालेला आहे. संस्था पूर्णतः संगिनीकृत असून ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा दृष्टिकोनातून आरटीजीएस लाँकर सुविधा वीज बिल भरणा केंद्र, नियमित कर्ज परतफेड करणारे सभासदास 2% व्याज परतावा व कर्जदारांच्या मृत्यू पक्षात कर्जारांच्या वारसांना पाच लाखापर्यंतचे "कर्जदार जीवन सोबती "निधी म्हणून कर्ज माफ केले जाते संस्थेने नेहमीच ठेवीदा व कर्जदार सभासदांच्या हिताचा विचार करून पारदर्शक कामकाज सुरू आहे. संस्थेच्या प्रधान कार्यालयासह दहा शाखाचा माध्यमातून कामकाज चालू आहे. दहा शाखा पैकी  सात शाखा  स्वमालकीच्या इमारतीमध्ये आहेत. व्हा. चेअरमन  आर एस पाटील, सरदार पाटील, विलास खांडेकर ,संभाजी कराळे,एस डी पाटील , अँड कृष्णात लव्हटे, पी के तुरुंबेकर सर्व संचालक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.


कोतोलीच्या महाराष्ट्र ना. पतसंस्थेला १ कोटी ७३ लाखांचा नफा- चेअरमन डी.जी.पाटील