बातम्या
शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले...
By nisha patil - 3/1/2025 1:12:02 PM
Share This News:
शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले...
वर्षाचा तिसरा दिवस भारताच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या घटनेचा साक्षीदार असुन या दिवसाची सर्वात खास गोष्ट म्हणजे या दिवशी भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. 3 जानेवारी 1831 रोजी जन्मलेल्या सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापिका आणि पहिल्या शेतकरी शाळेच्या संस्थापक होत्या.
सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका गावात झाला. सावित्रीबाई फुले या समाजसेविका, स्त्री मुक्ती चळवळीत सहभागी आणि देशाच्या पहिल्या शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. 19 व्या शतकामध्ये स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. सावित्रीबाईही लग्नापर्यंत शाळेत गेल्या नाहीत. त्यांचा नवरा तिसरीपर्यंत शिकला असुन यानंतर सावित्रीबाईंनी आपल्या पतीकडून शिक्षण घेऊन स्त्री हक्क, शिक्षण, अस्पृश्यता, सती, बालविवाह, विधवा पुनर्विवाह याबाबत समाजामध्ये जनजागृती केलीय. अंधश्रद्धा आणि रूढीवादी समजुती मोडून काढण्यासाठी त्यांनी दीर्घ संघर्ष केला. पतीसोबत त्यांनी मुलींसाठी 18 शाळा उघडल्या असुन 1848 मध्ये त्यांनी पुण्यामध्ये देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केलीय. त्यांचे समाजातील योगदान लक्षात घेता त्यांना भारतरत्न देण्याची आणि 3 जानेवारीला महिला दिन साजरा करण्याची मागणी करण्यात आली.
शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले...
|