बातम्या

चौगुले महाविद्यालयात क्रांतिसूर्य म. ज्योतिबा फुले यांना अभिवादन

Krantisurya Md in Chougule College


By nisha patil - 12/4/2024 9:02:45 AM
Share This News:



पन्हाळा :प्रतिनिधी श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज,माळवाडी-कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व मानसशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ.बी. एन.रावण यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
 

तसेच येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याची माहिती देणाऱ्या लेखांचे प्रकाशन भित्तीपत्रकामध्ये करण्यात आले सदर भित्तीपत्रकाचे प्रकाशन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ.बी.एन.रावण व स्टाफ सेक्रेटरी डॉ.यु.एन.लाड यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲक्टिव्हिटी प्रमुख डॉ.एस. एस.कुरलीकर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत इतिहास विभाग प्रमुख डॉ. यु.यु.पाटील यांनी केले तर आभार डॉ.बी.एस.शिंदे यांनी मानले


चौगुले महाविद्यालयात क्रांतिसूर्य म. ज्योतिबा फुले यांना अभिवादन