बातम्या

‘मिशन रोजगार’ साठी ‘क्रीडाई’ ने योगदान द्यावे – आमदार ऋतुराज पाटील

Kreedai should contribute for Mission Rozgar MLA Rituraj Patil


By nisha patil - 9/16/2023 10:58:57 PM
Share This News:



मिशन रोजगार’ साठी ‘क्रीडाई’ ने योगदान द्यावे – आमदार ऋतुराज पाटील 

कोल्हापूर ‘मिशन रोजगार’च्या माध्यमातून युवा पिढीला नोकरीच्या संधी मिळवून देण्याचे काम आम्ही सातत्याने करत आहोत. या उपक्रमामध्ये ‘क्रीडाई’ ने आपले योगदान द्यावे असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले.   
 

आमदार ऋतुराज पाटील यांनी क्रीडाई कोल्हापूरच्या कार्यालयाला भेट देऊन पदाधिकारी व संचालकांशी विविध विषयांवर  चर्चा केली. यावेळी ‘क्रीडाई’ कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत उपस्थित होते.  आमदार पाटील यांनी चर्चेवेळी सांगितले की, युवा पिढीला नोकरी मिळणे हे अत्यंत महत्वाचे असते. हा अजेंडा घेऊन युवा पिढीसाठी कौशल्य प्रशिक्षण त्याचबरोबर वेगवेगळ्या कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या माध्यमातून कोल्हापूरच्या प्रगतीला निश्चितपणे हातभर लावण्याचे काम आम्ही करत आहोत. ‘क्रीडाई’नेही कोल्हापूरच्या वेगवेगळ्या सामाजिक व महत्त्वाच्या प्रश्नामध्ये सहकार्याची भूमिका घेतली आहे. ‘मिशन रोजगार’च्या या उपक्रमातही  क्रीडाईने आपले योगदान द्यावे.

     

‘क्रीडाई’ कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत म्हणाले, ‘मिशन रोजगार’चा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. ‘क्रीडाई’मध्ये समाविष्ट  असणाऱ्या बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांना अभियंते,  मार्केटिंग, अकाउंटस याबरोबरच २० ते २२ प्रकारच्या मनुष्यबळाची आवश्यकता असते.  या माध्यमातून निश्चितपणे ‘मिशन रोजगार’साठीचे आम्ही सहकार्याची भूमिका घेऊ.

  यावेळी ‘क्रीडाई’ उपाध्यक्ष सचिन ओस्वाल व गौतम परमार, सचिव संदीप मिरजकर, कोषाध्यक्ष अजय डोईजड, व्यवस्थापन समिती सदस्य विजय माणगावकर, लक्ष्मीकांत चौगले, श्रीराम पाटील, आदित्य बेडेकर विश्वजीत जाधव, दीपक वाघुले, संदीप पोवार, नंदकिशोर पाटील, अमोल देशपांडे आदी उपस्थित होते.


‘मिशन रोजगार’ साठी ‘क्रीडाई’ ने योगदान द्यावे – आमदार ऋतुराज पाटील