बातम्या
बारामतीत 'कृषिक २०२५' या भव्य कृषि व पशु प्रदर्शन...
By nisha patil - 1/17/2025 2:22:36 PM
Share This News:
बारामतीत 'कृषिक २०२५' या भव्य कृषि व पशु प्रदर्शन...
कृषि व पशु प्रदर्शनाचे उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते...
बारामतीमध्ये 'कृषिक २०२५' या भव्य कृषि व पशु प्रदर्शनाचे उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते करण्यात आलंय. कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने 'कृषिक' नावाचं प्रदर्शन आयोजन केले जाते. एका दृष्टीने हे 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' तंत्र आहे हे अनेक क्षेत्रांमध्ये जगात प्रचंड परिवर्तन करणार असे शरद पवारांनी सांगितले.
बारामतीमध्ये 'कृषिक २०२५' या भव्य कृषि व पशु प्रदर्शनाचे उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते करण्यात आलंय. कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने 'कृषिक' नावाचं प्रदर्शन आयोजन केले जाते. याप्रसंगा शरद पवार म्हणाले... या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'. आता जगामध्ये एका विषयाच्या संबंधी अतिशय जागृती झालेली आहे. लोकांच्या आस्थाही आहे आणि ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. एका दृष्टीने हे 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' तंत्र आहे हे अनेक क्षेत्रांमध्ये जगात प्रचंड परिवर्तन करणार आहे..
महाराष्ट्रमध्ये ऊसावर उभी राहिलेली कारखानदारी ही अत्यंत महत्त्वाची कारखानदारी आहे. महाराष्ट्राच्या शेतीचं अर्थकारण हे जर आपण बघितलं तर ऊसाला प्रोत्साहन देणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून ते तंत्र नव्या पिढीच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचावं याची काळजी या प्रदर्शनात घेत आहोत. आम्हा सगळ्यांची साथ या कामाला, राज्य सरकारला आणि बाकीच्या यंत्रणेला मनापासून असेल. यावेळी क्रार्यक्रमास अजित पवार, पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे,याच्यासह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
बारामतीत 'कृषिक २०२५' या भव्य कृषि व पशु प्रदर्शन...
|