बातम्या

कृष्णा फाउंडेशन चा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

Krishna Foundation celebrated its anniversary with enthusiasm


By nisha patil - 10/10/2023 7:56:43 PM
Share This News:



कृष्णा  कला क्रीडा सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था कोल्हापूर याचा दुसरा वर्धापन दिन उत्साह सोहळा उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने क्रीडा कृष्णा फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सोनाली राजपूत यांनी जिल्ह्यातील होतकरू आणि सामाजिक संस्थांना कृष्णा अभिमान पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. त्याचबरोबर महिलांच्या कलागुणांना देण्यासाठी महिलांचा नृत्य अविष्कार देश मेरा रंगीला हा कार्यक्रम ही आयोजित केला होता या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला

कृष्णा  कला क्रीडा सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था कोल्हापूर याचा दुसरा वर्धापन दिन उत्साह सोहळा उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने क्रीडा कृष्णा फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सोनाली राजपूत यांनी जिल्ह्यातील होतकरू आणि सामाजिक संस्थांना कृष्णा अभिमान पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. यामध्ये सार्थक आर्ट सोशल अँड कल्चर फाउंडेशन चे सागर बगाडे, हिल रायडर्स एडवेंचर फाउंडेशनचे प्रमोद पाटील, वाईट आणि चे अशोक रोकडे, समर्थ श्रावणी महिला सेवाभावी संस्था, सावली फाउंडेशनचे निखिल कोळी, शिवसैनिक कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ वडणगे चे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, डॉग रेस्क्यू, वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे अमोल बुडे, निर्मिती फाउंडेशन साताऱ्याच्या स्मिता देशमुख यांचा सहभाग होता त्याचबरोबर महिलांच्या कलागुणांना देण्यासाठी महिलांचा नृत्यविष्कार, देश मेरा रंगीला ,हा कार्यक्रम ही आयोजित केला होता या नृत्या मधून राज्यातील विविधता पाहायला मिळाली. या कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील, महापालिका उपायुक्त साधना पाटील हे प्रमुख पाहुणे लाभले या कार्यक्रमाला महिलांचा प्रतिसाद भरभरून मिळाला त्याचबरोबर महिलांनी वेगवेगळ्या देशाच्या वेशभूषा करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.


कृष्णा फाउंडेशन चा वर्धापन दिन उत्साहात संपन्न