बातम्या
कृष्णा फाउंडेशनची कोण होणार महाराष्ट्राची ब्रायडल मेकअप क्वीन स्पर्धेची ही ठरली "मानकरी"
By nisha patil - 8/7/2024 5:44:53 PM
Share This News:
कृष्णा फाउंडेशन आयोजित कोण बनणार महाराष्ट्राची ब्रायडल मेकअप क्वीन ही स्पर्धा नुकतीच हॉटेल रॉयल पॅवेलियनमध्ये दिमाखात संपन्न झाली या स्पर्धेला राज्यातून विविध ठिकाणाहून मेकअप आर्टिस्टने सहभाग नोंदवला होता कृष्णा फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष सोनाली राजपूत यांनी ब्युटीशियन क्षेत्राला एक व्यासपीठ या स्पर्धेच्या निमित्ताने निर्माण करून दिलं सहा तारीख ला ग्रूमिंग सेक्शन आणि सात तारखेला स्पर्धा असं या स्पर्धेचे स्वरूप होतं यामध्ये लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन ठेवण्यात आलं होतं .
ब्रायडल मेकअप मध्ये महाराष्ट्रीयन साउथ,बंगाली आणि राजस्थानी असे लूक सादर करण्यात आले. यामध्ये मेकअप आर्टिस्ट तेजस्विनी काशीद यांनी साक्षी शिंदे यांच्यावर साउथ इंडियन लूक सादर केला आणि प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या, तर हेमंत विटे या मेकअप आर्टिस्टनी शीतल चंदेकर यांना पेशवाई लूक मध्ये सादर केलं आणि दुसऱ्या क्रमांकाचे विनर ठरले तसेच मेकअप आर्टिस्ट प्रिया जाधव यांनी प्रतीक्षा पाटील यांच्यावर राजस्थानी लुक सादर केला आणि तिसऱ्या क्रमांकाचे विजेते ठरले प्रथम क्रमांकाला आठ हजार किमतीचे 24 कॅरेट चोक सोने, कृष्णा फाउंडेशन करून देण्यात आले तर दुसऱ्या क्रमांकाला आदित्य ज्वेलर्स कडून चांदीची गणेश मूर्ती आणि तिसऱ्या क्रमांकाला ब्रायडल ज्वेलरी सेट देण्यात आला त्याचबरोबर प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सर्टिफिकेट आणि गिफ्ट देण्यात आले या कार्यक्रमाला महिलांचा उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला तसेच मीडिया पार्टनर म्हणून तारा न्यूजने काम पाहिले
कृष्णा फाउंडेशनची कोण होणार महाराष्ट्राची ब्रायडल मेकअप क्वीन स्पर्धेची ही ठरली "मानकरी"
|