बातम्या
कोल्हापुरात पुन्हा एकदा चर्चेत कृष्णराज महाडिक..
By nisha patil - 6/2/2025 12:57:42 PM
Share This News:
कोल्हापुरात पुन्हा एकदा चर्चेत कृष्णराज महाडिक..
शेतकऱ्याच्या दुःखात आधार! कृष्णराज महाडिक यांची मदतीची मोठी कृती
तीन म्हशींचा दुर्दैवी मृत्यू, कृष्णराज महाडिक यांनी दिली ' ची भेट
कागल तालुक्यातील व्हनाळी येथे एक हृदयद्रावक घटना घडली. बहादुर वाडकर या शेतकऱ्याच्या तीन म्हशी विजेच्या तुटलेल्या तारेच्या शॉकमुळे ओढ्यात मृत्युमुखी पडल्या. या घटनेने संपूर्ण कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले, कारण या जनावरांवरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. जवळपास पाच लाख रुपयांचे मोठे नुकसान झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले कृष्णराज महाडिक पुढे सरसावले. त्यांनी शेतकऱ्याला मदतीचा हात देत दीड लाख रुपये किंमतीची मुऱ्हा नावाची म्हैस भेट दिली. ही मदत मिळाल्यावर बहादुर वाडकर यांचे डोळे पाणावले. अशा कठीण प्रसंगी महाडिक यांनी दिलेली मदत संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
या संवेदनशील आणि तात्काळ मदतीच्या कृतीमुळे कृष्णराज महाडिक यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या सामाजिक भान आणि दातृत्वामुळे तरुणांसाठी ते आदर्श ठरत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या या उपक्रमाने लोकांच्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला आहे.
कोल्हापुरात पुन्हा एकदा चर्चेत कृष्णराज महाडिक..
|