बातम्या

"चिंचवाड येथे रोटरी क्लबच्या वतीने केटीएसई स्पर्धापरीक्षा आयोजन"

Ktse competitive exam organized by Rotary Club at Chinchwad


By nisha patil - 9/10/2024 8:39:37 PM
Share This News:



करवीर तालुक्यातील चिंचवाड येथे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउनच्या वतीने चार शिक्षण संस्थांसाठी केटीएसई स्पर्धापरीक्षेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात रोटरी क्लबच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाली.

सौ. अरुंधती महाडिक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शालेय वयातच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबाबत माहिती मिळावी आणि त्यासाठी त्यांना तयार करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

या स्पर्धेत चिंचवाड हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूल आणि मालती जोशी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमास मा. बी. एस. शिंपूगडे, मा. रमेश खटावकर, मा. अनुजा पाटील, मा. राहुल पाटील, मा. किरण घाटगे, ग्रामपंचायत सदस्य मा. भाऊखली पाटील, मा. सुदर्शन उपाध्ये, आणि मा. बाबुराव कोळी उपस्थित होते.

 


"चिंचवाड येथे रोटरी क्लबच्या वतीने केटीएसई स्पर्धापरीक्षा आयोजन"