कुंभोज ग्रामपंचायत तहकूब ग्रामसभा संपन्न,अनेक विषयावरती नुसती चर्चा, अंमलबजावणी होणे गरजेचे
By nisha patil - 1/6/2023 7:14:53 AM
Share This News:
कुंभोज वार्ताहर (विनोद शिंगे)
कुंभोज तालुका हातकलंगले येथील कोरम आभावी तहकुब झालेली ग्रामसभा आज कन्या शाळा कुंभोज येथे घेण्यात आली. परिणामी ग्रामपंचायत व गावातील अनेक युवकांनी मोबाईल वरून कुंभोज गावच्या विकासासाठी ग्रामस्थांनी ग्रामसभेला उपस्थित राहणे गरजेचे अशा आशयाचा मजकूर लिहून पाठवला होता. त्या आशयाला ग्रामस्थांनी चांगली सहकार्य देत आज मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी आपली उपस्थिती ग्रामसभेला दाखवली. काही वादग्रस्त विषय वगळता कुंभोज ग्रामपंचायतची ग्रामसभा अत्यंत शांततेत संपन्न झाली. सभेमध्ये अनेक विषयावरती भारदार चर्चा झाली परंतु सदर झालेल्या चर्चेवरती अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे मत ग्रामस्थातुन व्यक्त होत होते.
यावेळी कुंभोज ग्रामपंचायतीचा वाढीव गावठाण चा विषय, कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा परिसर सुशोभीकरण, गाव तलाव शिशुवीकरण, जलशुद्धीकरण प्रकल्प, कुंभोज आरोग्य केंद्र इमारतीचे उद्घाटन, नूतन कुंभोज ग्राम सचिवालयाचे बंद असलेले बांधकाम, गावातील घनकचरा प्रकल्प, मागील आर्थिक वर्षातील खर्चाला मंजुरी आदी विषयावरती चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे घनकचरा व्यवस्थापन जागा उपलब्ध झाली असून येत्या दोन दिवसात ग्रामपंचायती घंटागाडी चालू करण्यात येईल अशी आश्वासन कुंभोज ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत गळवी यांनी ग्रामस्थांना दिले. यावेळी घरकुल योजने संदर्भात नागरिकांनी आपल्या तक्रारी करून कायद्याच्या चाकोटीत बसवून शासकीय अधिकारी सर्व सामान्य नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत काही नागरिकांनी व्यक्त केले. यावेळी घरफाळा पाणीपट्टी वसुली संदर्भात जोरदार चर्चा करण्यात आली. तसेच तलाठी कार्यालयात चाललेला झिरो प्रतिनिधींचा आनागोधी कारभार कुठेतरी थांबला पाहिजे त्यासाठी तलाठी यांनी लक्ष घालावे अशी मागणी कुंभोज ग्रामस्थ वसंत माळी यांनी केली.
कुंभोज ग्रामपंचायतच्या विशेष फंडातून कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा शुशोभिकरण करण्याचा निर्णय यावेळी सर्वांमध्ये घेण्यात आला. यावेळी शासनाच्या नियमाप्रमाणे ग्रामपंचायत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार माजी पंचायत समिती सदस्य निर्मला माळी, नाभिक समाजाच्या महिला तालुकाध्यक्ष पूजा सपकाळ यांना देण्यात आला. यावेळी गावातील विविध प्रश्नावर नागरिक व ग्रामपंचायत सदस्यांचे वादविवाद झाले. परिणामी ग्रामसभा ही लोकशाही मार्गाने व्हावी अशी विनंती माजी सरपंच किरण नामे यांनी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना केली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच जयश्री जाधव उपस्थित होत्या. यावेळी महाविकास आघाडीचे घटनेचे किरण माळी, प्रकाश पाटील, किरण नामे सदाशिव महापुरे, दावीत घाटगे, धनाजी तिवढे, संभाजी मिसाळ ,तलाठी संभाजी घाटगे ,पोलीस पाटील मोहम्मद पठाण ,ग्रामसेवक चंद्रकांत दळवी, ग्रामपंचायत सदस्य शुभांगी माळी, माधुरी घोदे, विशाखा माळी, भारती पोद्दार सुदर्शन चौगुले, अशोक आरगे, आप्पासाहेब पाटील अमरजीत बंडगर, अजित देवमोरे तसेच ग्रामस्थ आरोग्य विभाग शिक्षण विभाग शेती विभागातील अधिकारी उपस्थित होते.
कुंभोज ग्रामपंचायत तहकूब ग्रामसभा संपन्न,अनेक विषयावरती नुसती चर्चा, अंमलबजावणी होणे गरजेचे
|