बातम्या
कुंभोजमध्ये आषाढीदिवशी कुबा॔णी करणार नाही.समस्त सुन्नत मुस्लिम जमातचा निणय॔,दगा॔ मशीदीत बैठक
By nisha patil - 6/27/2023 4:48:26 PM
Share This News:
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे ) कुंभोज ता.२७.तब्बल बारा वषा॔नी आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने येथील मुस्लिम बांधव आषाढी एकादशी दिवशी बकरी ईद साजरी करणार नाहीत तसा निणय॔ झाल्याची माहीती सुन्नत मुस्लिम समाजाचे अध्यक्ष रईस मुजावर यांनी दिली.दगा॔ मशीदीत सुन्नत मुस्लिम जमातची बैठक झाली.यामध्ये सवा॔नुमते हा निण॔य घेण्यात आला.अध्यक्ष मुजावर म्हणाले,कुंभोज हे हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आहे. त्यामुळे गावातील सव॔ मुस्लिम बांधवांनी गुरुवारी ईदची नमाज पठण करायची,परंतु कुबा॔णी त्या दिवशी न करता दुस-या दिवशी (शुक्रवारी) करायची तसा निणय॔ घेतला आहे.बैठकीस वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चाॅदसो मुजावर,मुस्लिम ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जहाॅगीर हजरत,उपाध्यक्ष मुबारक मुल्ला,सदस्य शकील मकानदार,शहानवाज मुजावर, आरिफ तांबोळी,राजू मुजावर,तय्यब सुतार,जुबेर तांबोळी,शहानवाज मकानदार,हाफिज इम्दादुल्लाह मुजावर,हाफिज अहमंद तांबोळी,हाफिज सन्नाऊल्लाह आतार उपस्थीत होते.
कुंभोजमध्ये आषाढीदिवशी कुबा॔णी करणार नाही.समस्त सुन्नत मुस्लिम जमातचा निणय॔,दगा॔ मशीदीत बैठक
|